शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

मुस्लीम महिलांनी पोलीस, अग्निशामक दलाच्या जवानांना बांधली राखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 9:30 PM

समाजाच्या सुरक्षिततेसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे झटणारे पोलीस, डॉक्टर, अग्निशामक दलाच्या जवानांच्या कार्याकडे दुर्लक्ष करता येणे अशक्य आहे, हे लक्षात घेऊन प्रभाग १४च्या नगरसेवक समीना मेमन यांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने या तिन्ही घटकांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली.

ठळक मुद्दे मुस्लीम महिलांनी पोलीस, डॉक्टर आणि अग्निशामक दलाच्या जवानांना राखी बांधली.अग्निशामक दलाच्या जवानांच्या कार्याकडे दुर्लक्ष करता येणे अशक्य

नाशिक : समाज ज्यांच्यामुळे सुरक्षित आहे, त्यांच्याविषयीची समाजाकडून कृतज्ञता व्यक्त होणे गरजेचे असते. त्यामुळे समाजाच्या रक्षणकर्त्यांनाही अधिक बळ मिळते अन् त्यांचा उत्साह वाढतो. ही जाणीव ठेवत रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुने नाशिक परिसरातील मुस्लीम महिलांनी पोलीस, डॉक्टर आणि अग्निशामक दलाच्या जवानांना राखी बांधली.

आपत्कालीन परिस्थिती उद्भवली की समाजाला तीन घटक प्रामुख्याने आठवतात. मात्र जेव्हा या तीन घटकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळते तेव्हा मात्र समाजाला विसर पडलेला असतो. समाजाच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज राहणाऱ्या आणि अविभाज्य घटक म्हणून समाजाच्या सुरक्षिततेसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे झटणारे पोलीस, डॉक्टर, अग्निशामक दलाच्या जवानांच्या कार्याकडे दुर्लक्ष करता येणे अशक्य आहे, हे लक्षात घेऊन प्रभाग १४च्या नगरसेवक समीना मेमन यांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने या तिन्ही घटकांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली. समाजातील मुस्लीम महिलांसमवेत भद्रकाली पोलीस ठाणे, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, शिंगाडातलाव येथील अग्निशामक दलाचे मुख्यालय गाठून सकाळी तेथील अधिकारी, कर्मचाºयांच्या हातावर राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली आणि समाजाच्या संरक्षणासाठी आम्ही सदैव सज्ज राहून कर्तव्य बजावणार असल्याचे वचनही यावेळी संबंधितांनी महिलांना दिले. रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीचे नाते अतुट करणारा सण असून, या सणाच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधून ओवाळते आणि भावाकडून आपल्या रक्षणाचे वचन घेते, असा अप्रत्यक्ष संदेश या सणामागे दडलेला आहे.---

टॅग्स :NashikनाशिकRaksha Bandhanरक्षाबंधनMuslimमुस्लीमNashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दल