सटाणा : बागलाण तालुक्यातील बुंधाटे-वड्याचे पाडे ग्रामपंचायत अंतर्गत गावठाण जागांची परस्पर विक्र ी करून गाव पुढाऱ्यांनी पैसे लाटल्याचे प्रकरण चांगलेच तापले असून याप्रकरणी रेकॉर्ड गायब झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, यासंबंधीच्या तक्रारीनंतर तालुका गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.गावातील ग्रामस्थ आण्णा काशिनाथ बोरसे यांनी याप्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांपासून ते गटविकास अधिकाऱ्यांपर्यंत लेखी तक्रारी केल्या आहेत. विद्यमान ग्रामसेवक यांना सन २०१५ पुर्वीचे कुठलेही रेकॉर्ड ताब्यात मिळालेले नसल्याने गावठाण जागांच्या रेकॉर्डचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गरीब लाभार्थ्यांना विक्र ी न करण्याच्या अटीवर देण्यात आलेल्या घरकुलांची सर्रास विक्र ी झाल्याचे उघडकीस आले आहे. काही गावपुढाºयांनी ग्रामपंचायत अंतर्गत गावठाण जागा तत्कालीन ग्रामसेवक व पंच कमिटी यांना हाताशी धरून परस्पर रेकॉर्ड बनवून विक्र ी केल्याचा आरोप आण्णा काशिनाथ बोरसे यांनी दाखल केलेल्या तक्र ारीत केला आहे. याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.
बुंधाटे-वड्याचे पाडे ग्रामपंचायतीच्या जागांची परस्पर विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 3:26 PM
रेकॉर्ड चोरीला गेल्याचा आरोप, सखोल चौकशीचे आदेश
ठळक मुद्देग्रामसेवक यांना सन २०१५ पुर्वीचे कुठलेही रेकॉर्ड ताब्यात मिळालेले नसल्याने गावठाण जागांच्या रेकॉर्डचा प्रश्न ऐरणीवर