सर्वतीर्थ टाकेद : गॅस ग्राहकांचा कोणताही विचारी नकरता इगतपुरी तालुक्यातील काही गावातील गॅस ग्राहकांचे कनेक्शन नव्याने सुरु झालेल्या गॅस एजन्सीकडे परस्पर वर्ग केल्याने ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.इगतपुरी तालुक्यातील घोटी जवळील घोटी-सिन्नर मार्गालगत भारत गॅस कंपनीची राज भारत गॅस एजन्सी असून यांच्याकडे घोटी जवळील तळोशी, तळोघ,खैरगांव, देवळे, कावनाई, वाकी, काळुस्ते आदी गावांतील घरगुती गॅस सिलेंडरचे कनेक्शन आहेत. मात्र गेल्या तीन महिन्यांपासुन अचानकपणे कंपनीने आतापर्यंत साधारण दोन ते तीन हजार ग्राहकांचे कनेक्शन हे परस्पर गोंदे दुमाला येथे नव्याने स्थापित असलेल्या एजन्सीकडे ग्राहकांना विचारात न घेता हस्तांतरित केले आहे. तर काही ग्राहक स्वत: तेथे जाऊन आपले कनेक्शन पूर्व ठिकाणी करुन घेत आहेत.मात्र यासाठी त्यांना वेळेची आणि आर्थिक झळ बसत आहे. तर अजूनही काही कनेक्शन हस्तांतरित केले जात आहे. त्यामुळे येथील जवळच्या गावातील ग्राहकांना सिलेंडरसाठी जवळची एजन्सी सोडून घोटी पासून १५ किलोमीटर गोंदे दुमाला येथे जावे लागणार आहे.त्यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय होणार आहे. भारत गॅस कंपनीने आणि पुरवठा विभागाने याची तात्काळ दखल घेऊन कनेक्शनचे होत असणारे हस्तांतरण थांबवावे आणि हस्तांतरित झालेले कनेक्शन पूर्व ठिकाणी जवळील गॅस एजन्सीकडे पाठवावे अशी मागणी परिसरातील ग्राहक करीत आहेत.
गॅस ग्राहकांचे कनेशन परस्पर हस्तांतरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2019 4:49 PM
सर्वतीर्थ टाकेद : गॅस ग्राहकांचा कोणताही विचारी नकरता इगतपुरी तालुक्यातील काही गावातील गॅस ग्राहकांचे कनेक्शन नव्याने सुरु झालेल्या गॅस एजन्सीकडे परस्पर वर्ग केल्याने ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ठळक मुद्देसर्वतीर्थ टाकेद : नविन एजन्सीकडे नावे दिल्याने गॅस धारक संतप्त