आज फैसला : अपवाद वगळता निवडणूकप्रक्रिया शांततेतनाशिक : जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत ९२.८५ टक्के मतदान झाले असून, सोमवारी (दि. १४) मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत २१ जागांसाठी ५२ उमेदवार रिंगणात असून, त्यासाठी जिल्ह्यातील दहा हजार १४७ सभासदांपैकी नऊ हजार ४२१ सभासदांनी रविवारी (दि. १३) मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत प्रामुख्याने सत्ताधारी प्रगती पॅनल विरोधी समाज विकास पॅनलमध्ये परस्परविरोधी लढत रंगल्याने यावर्षीच्या निवडणुकीत चुरस आहे. विद्यमान सरचिटणीस नीलिमा पवार यांच्याविरोधात नाशिक जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष तथा विद्यमान सभापती नितीन ठाकरे यांच्यात यंदा काट्याची लढत झाली. दोन्ही पॅनलच्या माध्यमातून संस्थेचे पदाधिकारी परस्पर विरोधी उभे ठाकल्याने दोन्ही पॅनलने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मविप्रसाठी रविवारी (दि. १३) सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत जिल्ह्णातील १४ मतदान केंद्रांवरील ४८ बुथवर काही अपवाद वगळता मतदानप्रक्रिया शांततेत पार पडली. त्यासाठी ५५० कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली होती. संस्थेचे एकूण दहा हजार १४७ आजीव सभासद असून, त्यापैकी सुमारे ९२.८५ टक्के म्हणजेच नऊ हजार ४२१ सभासदांनी रांगा लावून मतदान केले. नाशिक शहरातील आजीव सभासदांनी केटीएचएम महाविद्यालयात मतदान केले, तर ग्रामीणसाठीचे मतदान अभिनव शाळेत झाले. इतर सर्व मतदान प्रत्येक तालुक्यातील मतदान केंद्रावर घेण्यात आली. सेवकांतून निवडून येणाºया तीन उमेदवारांसाठी केवळ नाशिकमध्ये केटीएचएम महाविद्यालयातील मतदान केंद्रात मतदानप्रक्रिया घेण्यात आली. या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी सकाळी केटीएचम महाविद्यालयाच्या जीमखाना विभागात होणार आहे. दरम्यान, दुपारी रावसाहेब थोरात सभागृहात संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार असून यात नूतन पदाधिकाºयांचा सत्कार होऊन नवीन कारभारी पदभार स्वीकारणार आहे. परंतु, यावेळी झालेली चुरशीची निवडणूक लक्षात घेता सर्वसाधारण सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.मविप्रसाठी राबविण्यात आलेल्या निवडणूक प्रक्रियेत रविवारी जिल्हाभरातील विविध मतदान कें द्रांवर झालेल्या मतदानाची एकत्रितरीत्या सोमवारी (दि. १४) सकाळी ८ वाजता मविप्रच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या जिमखाना हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे. कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात ही मतमोजणी होणार असून त्यासाठी सुसज्ज असा मतमोजणी कक्ष उभारण्यात आला आहे. येथे संचालक मंडळ, पदाधिकारी व सेवक संचालक मतमोजणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.कार्यकर्ते आमने-सामनेमविप्र संस्थेची निवडणूक दोन्ही पॅनलने प्रतिष्ठेची केली असल्याने दोन्ही पक्षांकडून एक एक मत मिळविण्यासाठी चुरस सुरू असताना मतदान संपण्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये मविप्र वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णवाहिकेतून निंबा शिंदे यांना मतदान करण्यासाठी आणण्यात आले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी वेळ संपल्याचे सांगत रुग्णवाहिका अडविण्याचा प्रयत्न केल्याने समाजविकास व प्रगती पॅनलचे कार्यक र्ते काही क्षण आमने-सामने आले. परंतु पोलीस प्रशासन व काही ज्येष्ठ सभासदांनी मध्यस्थी केल्याने निंबा शिंदे यांना रुग्णवाहिकेसह मतदानाठी मतदान केंद्रात सोडण्यात आले.तालुकानिहाय मतदानतालुका एकूण मतदान झालेले मतदान टक्केवारीइगतपुरी- १४२ १३६ ९५,७७ %कळवण व सुरगाणा- ३४८ ३१९ ९१.६७ %चांडवड- ६९१ ६८१ ९८.५५ %दिंडोरी व पेठ- ८३४ ७८१ ९३.६५ %नाशिक शहर- ८७७ ७४४ ८४.८३ %निफाड- २८५२ २६७९ ९३.९३ %नांदगाव- २९४ २६२ ८९.१२ %सटाणा- १४०९ १३१६ ९३.४० %मालेगाव- ७७० ७१३ ९२.६० %येवला- २०४ १९२ ९४.१२ %सिन्नर- ३३५ ४०७ ९३.५६ %देवळा- ५८७ ५६१ ९५.६७ %नाशिक ग्रामीण- ७०४ ६२१ ८९.४९ %सेवक सभासद- ४६४ ४३६ ९३.९७ %निलीमा पवार मतदान करताना छायाचित्र ६५कार्यकर्ते आमने-सामनेमविप्र संस्थेची निवडणूक दोन्ही पॅनलने प्रतिष्ठेची केली असल्याने दोन्ही पक्षांकडून एक एक मत मिळविण्यासाठी चुरस सुरू असताना मतदान संपण्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये मविप्र वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णवाहिकेतून निंबा शिंदे यांना मतदान करण्यासाठी आणण्यात आले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी वेळ संपल्याचे सांगत रुग्णवाहिका अडविण्याचा प्रयत्न केल्याने समाजविकास व प्रगती पॅनलचे कार्यक र्ते काही क्षण आमने-सामने आले. परंतु पोलीस प्रशासन व काही ज्येष्ठ सभासदांनी मध्यस्थी केल्याने निंबा शिंदे यांना रुग्णवाहिकेसह मतदानाठी मतदान केंद्रात सोडण्यात आले.
मविप्र : अभूतपूर्व ९३ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:16 AM