नाशिक : ‘‘माझा भाऊ बरा होत आला होता. दोन-तीन दिवसात त्याला सोडले असते. पण माझा भाऊ ऑक्सिजनविना तडफडून तडफडून गेला. त्याचं ते तडफडणं खूप भयानक होतं, मी काहीच करु शकलो नाही’’, अशी शोकसंतप्त भावना सुशील वाळूकर यांनी भावाच्या मृत्यूनंतर व्यक्त केली.
‘‘खूप चांगला होता हो माझा प्रमोदभाऊ . थोड्या वेळापूर्वी मी त्याचा डबा घेऊन आलो. त्याला म्हणालो जेवून घे. त्यावर तो म्हणाला, १५-२० मिनिटांनी जेवतो. मी म्हणालो, ठीक आहे. थोड्या वेळाने जेवेल. पण तेवढ्यात ऑक्सिजनचा पुरवठा थांबला आणि सगळा अनर्थ झाला. भाऊ गेला हो आमचा. माझ्यासमोर अक्षरश: जीव तडफडून, तडफडून गेला. हे काय घडलं. आता घरी काय सांगू, काही कळत नाही. कुणावर अशी वाईट वेळ येऊ नये’’ अशा शब्दात वाळूकर यांनी त्यांच्या शोकसंतप्त भावना व्यक्त केल्या.
फोटो
२१वाळूकर