शहरातील बुंदेलपुरा भागात राजू उर्फ राजेंद्र गुजर (28) याने आई लीलाबाई कांतीलाल गुजर (70) यांच्याकडे मौजमजेसाठी पैशांची मागणी केली मात्र नकार दिल्याने शिवीगाळ करीत त्याने जबर मारहाण केल्याने आईचा मृत्यू झाला. राजेंद्र हा कुसंगतीमुळे गेल्या अनेक वर्षापासून कुटुंबियांना त्रास देत होता. शनिवारी रात्री त्याने आईकडे पैशांची मागणी केली. मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने राजू याने मारहाण केली. त्यांना उपचारार्थ ग्रामीण रु ग्णालयात दाखल नेले असता त्या मयत झाल्या होत्या. याबाबत आरोपीचा भाऊ संदीप गुजर याने येवला शहर पोलीस ठाण्यात तक्र ार नोंदवली. त्यानुसार येवला शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी सहाय्यक पोलिस अधिक्षक मनमाड आर. रागसुधा,येवला शहर पोलीस निरीक्षक नानासाहेब नागदरे यांनी भेट देऊन आरोपीस तत्काळ अटक करण्यात आली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे, चद्रकांत निर्मळ, हवालदार अतुल फलके, विजय पैठणकर करीत आहेत.
येवल्यात पैशांसाठी मुलाने केला आईचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 18:44 IST