सटाणा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभिनव उपक्रमाचा आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते चौंधाणे येथून शुभारंभ करण्यात आला. आरोग्य विभागाच्या वतीने तातडीच्या उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल सोनवणे यांनी दिली. सध्या बागलाण तालुक्यात कोरोनाने थैमान माजवले असून, तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील प्रत्येक कुटुंबाची सखोल चौकशी केली जाणार असून, प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. बाधित रुग्णास स्वत:च्या घरी राहून उपचार घेता येणार आहेत. यासाठी गावातील आशा, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी , आरोग्य कर्मचारी तसेच कोरोनायोद्धा यांची टीम तयार करण्यात आली आहे. ही टीम गावातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करून व त्यांना आवश्यक त्या सूचना देऊन त्यांना स्वत:ची व कुटुंबाची काळजी कशी घ्यायची याबाबत माहिती देणार आहे. यावेळी सरपंच लीलाबाई मोरे, उपसरपंच नंदू मोरे, माजी सरपंच राकेश मोरे, केदा मोरे, ग्रामसेवक निंबा वाघ, बिंदू शर्मा, डॉ. शेखर मुळे, संदीप खैरनार डॉ. गौरी, आरोग्यसेवक भाऊसाहेब भदाणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सटाणा तालुक्यात ‘माझे कुटुंब माझे अभियान’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 4:33 PM
सटाणा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभिनव उपक्रमाचा आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते चौंधाणे येथून शुभारंभ करण्यात आला. आरोग्य विभागाच्या वतीने तातडीच्या उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल सोनवणे यांनी दिली.
ठळक मुद्दे गावातील प्रत्येक कुटुंबाची सखोल चौकशी केली जाणार