सध्या सरकारी रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. यापूर्वी फ्रंटलाइनवरील आरेाग्य कर्मचारी त्यानंतर महसुली कर्मचाऱ्यांना कोरेानाची लस टोचली जात आहे. प्रश्न असा आहे की, ज्येष्ठ नागरिकांना आताच लस दिली जाणे आवश्यक होते का? जे ज्येष्ठ नागरिक कुटुंब किंवा इतर कुणाशी संपर्कात नाहीत. त्यांच्याही कुणी फारसे संपर्कात येत नाहीत, अशाही ज्येष्ठांची गर्दी होत आहे. यातच ज्येष्ठांमध्ये अधिक रुग्ण असतात. त्यामुळेदेखील यंत्रणेवर ताण येतो. ज्येष्ठांना नाहक चकरा माराव्या लागतात. सातत्याने संपर्कात येणारे कर्मचारी, दुकानदार, फेरीवाले, पेपरविक्रेते, दूधवाले यांना प्राधान्य देणे अपेक्षित आहे. कॉलेज, क्लासेसला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही लस मिळावी यासाठीचा क्रम निश्चित होणे अपेक्षित आहे असे वाटते.
- प्रमोद दामले, पंचवटी.
सिटीझन स्पेस
वाढत्या महागाईने जनता ’गॅसवर’
मध्यंतरी जिल्हा केरोसिनमुक्त झाल्याची चर्चा झाली. केंद्राकडूनही उज्ज्वला गॅसचे गोडवे गायले गेले. धान्य, तेल, डाळी महाग झाल्यावरही त्यावर आता चर्चा होत नाही. अनेकांचे रोजगार कमी झाले आहेत तर असलेल्यांना पुरेसा पगारही दिला जात नाही. तरीही केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये जनतेच्या प्रश्नाचे प्रतिबिंब उमटताना दिसत नाही. राजकीयदृष्ट्या एकमेकांना कोंडीत पकडण्यासाठी सर्वसामान्यांना मात्र वेठीस धरले जात आहे का, असा प्रश्न पडतो. जनतेचे वाली कुणी राहिले नाही हेच खरे.
- शशिकांत पारेसर, जेल रोड