शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिक स्वयंशिस्त पाळत नसल्याने यापुढे सक्ती करावी लागेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी फर्मानच काढले आहे. शहरातील गर्दी पाहता नागरिकांमध्ये बेफिकिरी वाढल्याचे आणि त्यामुळेच कोरोना वाढण्याची भीती व्यक्त होत असेल तर ती अजिबात अनाठायी नाही. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळलीच पाहिजे हेही खरे. याचा अर्थ प्रशासनाकडून काहीच करू नये हेही योग्य वाटत नाही. शहरातील वाढती गर्दी, लग्नसोहळे, मंत्र्यांचे दौरे बैठका, निदर्शने, भरगच्च बाजारपेठा असताना प्रशासनाकडून आजवर कोणते प्रयत्न झाले हेही पाहणे महत्वाचे आहे.
- अनिरुद्ध कांगणे, नाशिक
----सिटीझन स्पेस----
श्रीसंत गाडगे महाराजांचे स्मारक अपूर्ण
संतश्री गाडगे महाराज बाबांची १४५ वी जयंती येत्या २३ रोजी होत आहे. मात्र शहरातील गाडगेबाबांचे स्मारक अजूनही पूर्णत्वास आलेेले नाही ही शोकांतिका आहे. बाबांचा पुतळा गेल्या १२ वर्षापासून पूर्ण होऊ शकलेला नाही. हा पुतळा नेमका कुठे आहे हेही समोर आलेले नाही. केवळ परवानग्यांमुळे हे काम शासकीय पातळीवर अडकून पडले असल्याचे सांगितले जाते. परंतु ही फार मोठी अडचण नाही. प्रशासनाने तातडीने याबाबतचा सकारत्मक निर्णय घ्यावा. -
- रामदास गायकवाड, राजेंद्र हिवाळे.