नाशिक : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी देशाबाहेर जाऊन लढा उभारावा लागेल आणि तो मी उभारणारच..., माझी फौज भारताला जलदपणे पारतंत्र्यातून मुक्त करेल, असे ठणकावून सांगणारे नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारताच्या स्वातंत्र्य इतिहासातील अद्भुत व्यक्तिमत्त्व आहे. राष्टÑप्रेमाच्या भावनेतून देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करायचे हेच नेताजींचे अंतिम ध्येय होते, असे प्रतिपादन मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी केले.शंकराचार्य न्यास, आयाम संस्था व इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गोल्डन हेरिटेज : संस्कारमालेअंतर्गत राष्ट्रपुरुषांच्या जीवनगाथांमधून मनआरोग्याचे प्रशिक्षण या उपक्र माच्या माध्यमातून शनिवारी (दि.२०) ‘नेताजी, वन मॅन टू आर्मी’ या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. कुर्तकोटी सभागृहात या संस्कारमालेचे पहिले पुष्प नाडकर्णी यांनी दृकश्राव्य यंत्राच्या आधारे गुंफले.यावेळी नाडकर्णी यांनी नेताजींच्या कार्यावर प्रकाश टाकला. राष्टÑाच्या उन्नतीसाठी समर्पण करणे हाच त्यांचा उद्देश राहिला. त्यामुळे नेताजींनी लोकमान्य टिळकांच्या तुरुंगातील कोठडीला ‘देवालय’ असा शब्दप्रयोग करण्याचे धाडस इंग्रज अधिकाऱ्यांपुढे दाखविले आणि त्या कोठडीमध्ये मला राहायचे अशी इच्छाही बोलून दाखविली. भारत हा असा एकमेव देश आहे, की जेथे सत्तेत राहून जितके लोकप्रिय होता येत नाही, तितके सत्तेत न राहता लोकप्रिय होता येते, असे नेताजींनी त्यावेळी सांगितले होते. सरकारी नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर ते गांधीजींना जाऊन भेटले; परंतु त्यांच्या व गांधीजींच्या विचारांमध्ये तफावत होती हे लक्षात आल्यानंतर ते त्यांच्यापासून दूर गेले, असे यावेळी नाडकर्णी म्हणाले.‘ती’ योजना उत्तम व्यवस्थापनाचा धडाभारताबाहेर लढा उभारून इंग्रजांना धडा शिकविण्यासाठी नेताजींनी वेशांतर करून इंग्रजांच्या नजरकै देतून देशाबाहेर निसटण्याचा निर्धार केला. पुतण्या शिशिर यांच्या मदतीने अत्यंत नियोजनबद्धरीत्या देशाबाहेर जाण्यास यश मिळविले व जपानमध्ये आझाद हिंद फौजेचे पुनरु ज्जीवन केले. देशातून बाहेर पडण्यासाठी नेताजींनी आखलेली योजना उत्तम व्यवस्थापनाचा धडाच होय, असे नाडकर्णी यांनी यावेळी सांगितले.
‘माझी फ ौज देशाला स्वातंत्र्य मिळवून देईल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:56 AM
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी देशाबाहेर जाऊन लढा उभारावा लागेल आणि तो मी उभारणारच..., माझी फौज भारताला जलदपणे पारतंत्र्यातून मुक्त करेल, असे ठणकावून सांगणारे नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारताच्या स्वातंत्र्य इतिहासातील अद्भुत व्यक्तिमत्त्व आहे. राष्टÑप्रेमाच्या भावनेतून देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करायचे हेच नेताजींचे अंतिम ध्येय होते, असे प्रतिपादन मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी केले.
ठळक मुद्दे सुभाषचंद्र बोस यांच्या कर्तृत्वावर आनंद नाडकर्णी यांचा प्रकाशझोत