शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :अजितदादांनी १५ नेत्यांना दिले एबी फॉर्म; कोणत्या आमदारांना मिळाली संधी? वाचा...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "त्यांना तिकडे उभे राहायचे असेल तर मी..."; संदीप नाईकांचे बंडखोरीचे संकेत, गणेश नाईकांनी दिली प्रतिक्रिया
3
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष
4
"सकाळी ८ वाजता फोन आला तसं ५०० जण मुंबईला सोबत आले.."; हिरामण खोसकर काय म्हणाले?
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: साताऱ्यात भाजपाची आघाडी, मविआचं ठरेना; कोण दिग्गज असणार?
6
विधानसभेसाठी वंचितची पाचवी यादी जाहीर; बारामतीतून कोणाला दिली उमेदवारी?
7
आचारसंहिता लागल्यापासून राज्यात आतापर्यंत तब्बल 'इतक्या' कोटी रुपयांची बेकायदा मालमत्ता जप्त! 
8
शिंदेंसोबतचे 'ते' २-३ नेते परतण्याच्या मनस्थितीत पण...; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
9
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्या व्यक्तीने आता मागितली माफी, म्हणाला...
10
"भाजप विरोधी होणे गुन्हा आहे का? आम्ही त्यालाच मतदान करणार जो..."; अविमुक्तेश्वरानंद महाराष्ट्रात कुणासोबत?
11
MNS Candidate: राज ठाकरेंनी राजू पाटलांसह दोन उमेदवारांच्या नावाची केली घोषणा
12
जरांगे फॅक्टरला उत्तर, भाजपचा प्लान ठरला; मराठवाड्यातील १६ पैकी किती ठिकाणी मराठा उमेदवार दिले?
13
मोठी बातमी: भाजपच्या दोन बड्या नेत्यांची मुले शिवसेनेच्या तिकिटावर लढणार?; शिंदेभेटीमुळे भुवया उंचावल्या
14
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महायुती विरुद्ध मविआ; मराठवाडा सत्तेची समीकरणं बदलणार?
15
प्रेरणादायी! ४ वेळा नापास, परीक्षेच्या आदल्या रात्री पॅनिक अटॅक; UPSC क्रॅक करून केली कमाल
16
महाराष्ट्र निवडणुकीत संघानं बनवली रणनीती; कोणकोणत्या मुद्द्यांवर करणार प्रचार?
17
राज्यात पुन्हा महायुतीचंच सरकार येणार, कारण...; मध्य प्रदेशचं उदाहरण देत पडळकरांनी सांगितलं गणित
18
कुठे हसू तर कुठे अश्रू! न्यूझीलंडच्या महिला चॅम्पियन; आफ्रिकेच्या पोरींच्याही पदरी निराशा Photos
19
"हा माझा चॉईस नव्हता, पण..."; लोकप्रिय अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री?, आता केला मोठा खुलासा
20
उद्धव ठाकरे-भाजपा पुन्हा एकत्र येणार?; संजय राऊतांनी एका वाक्यातच पाणउतारा केला

रहस्यप्रधान ‘माय डिअर शुबी’

By admin | Published: November 22, 2015 11:55 PM

राज्य नाट्य : ‘नड नड कानडे’ नाटकही सादर

नाशिक : ‘त्या’ घरात मृतदेह असल्याचा सीआयडी अधिकाऱ्याला फोन येतो... तपासासाठी तो घरीही पोहोचतो; पण त्या घरातल्या गूढ वातावरणाने रहस्य अधिकच गडद होत जाते आणि ते रसिकांना अखेरपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवते... राज्य नाट्य स्पर्धेत परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आर. एम. ग्रुपच्या वतीने ‘माय डिअर शुबी’ हे रहस्यप्रधान नाटक आज सायंकाळी सादर झाले. निरंजन मार्कंडेयवार लिखित या नाटकाचे दिग्दर्शन व प्रमुख भूमिका प्रशांत हिरे यांची होती. निर्जन वस्तीतल्या एका घरात साळगावकर नामक महिला आपल्या तान्ह्या मुलीसोबत राहत असते. तिच्या घरी मृतदेह असल्याचा फोन सीआयडी अधिकाऱ्याला येतो. चौकशीसाठी घरी पोहोचल्यानंतर त्याला स्वयंपाकघरात मेलेले मांजर आढळून येते. तिथून कथेतील गुंता वाढत जातो. नेमका खून कोणाचा होतो, महिलेच्या विक्षिप्त वागण्याचे कारण काय, मांजराचे रहस्य काय, या गोष्टी रसिकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवतात. लक्ष्मी पिंपळे, अस्मी राजेश यांच्या भूमिका होत्या. नेपथ्य गणेश सोनवणे, प्रकाशयोजना रवि रहाणे, संगीत रोहित सरोदे, रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा मानसी शुक्ल, आर्या प्रशांत, नृत्य दिग्दर्शन श्रीकांत वाखारकर यांचे होते. तत्पूर्वी, सकाळच्या सत्रात संकर्षण युवा फाउंडेशनच्या वतीने नड नड कानडे हे हरीश जाधव लिखित व विजय दीक्षित दिग्दर्शित नाटक सादर झाले. विनोदाच्या अंगाने जाणारी, पण रहस्यमय वळणे घेणारी कथा त्यात सादर करण्यात आली. सुभाष व सुहास या दोन भावांपैकी सुभाषचा खून होतो. एक इसम सुहासकडे येऊन सुभाषने आपल्याकडून चार लाख रुपये घेतल्याचे सांगतो. तशी चिठ्ठीही सादर करतो. सुभाषचा खून कोण करतो, हे रहस्य नाटकात शेवटी उलगडते. गणेश सरकटे, अजय तारगे, अमित रेलकर, अक्षता संन्याशिव यांच्या प्रमुख भूमिका होत्या. प्रकाशयोजना ईश्वर जगताप, रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा अविनाश पोळ यांची होती.-: आजचे नाटक : -या वळणावर(मेनली अमॅच्युअर्स, नाशिक)वेळ : सायंकाळी ७