नाशिक : शासकीय कामकाजात केलेली अनियमितता व वसुलीत उदासीनता दाखविल्याने निफाडचे तहसीलदारविनोद भामरे यांना जिल्हाधिकाºयांनी सक्तीने रजेवर पाठविले आहे.दरम्यान तहसीलदार भामरे यांच्याकडून रजेवर जात असल्याचे लिहून घेण्यात आले आहे. दरम्यान, भामरे यांच्या दोन वर्षांच्या कामकाजाच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात येऊन दोन दिवसांत अहवाल देण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. तहसीलदार भामरे यांनी निफाड तहसीलदारपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांच्या कामकाजात अनियमितता असल्याच्या तक्रारी होत्या. दरमहिन्याच्या महसूल अधिकाºयांच्या बैठकीतही घेण्यात येत असलेल्या आढाव्या बैठकीत भामरे यांना जिल्हाधिकाºयांना चांगलेच फैलावर घेतल्याचे तसेच वेळोवेळी पाणउतारा केल्याच्या घटना घडल्या आहेत. निफाड तहसील कार्यालयाला वार्षिक कर वसुलीचे उद्दिष्टापैकी फक्त आठ टक्केच वसुली झाल्याने गेल्या बैठकीतच जिल्हाधिकाºयांनी त्यांना सक्तीने रजेवर पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याची अंमलबजावणी करण्यात आली असून, त्यासाठी भामरे यांच्याकडून रजेवर जात असल्याचे लिहून घेण्यात आले आहे. भामरे यांचा पदभार मालेगावचे महानगर दंडाधिकारी आवळकंठे यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे. दरम्यान, भामरे यांच्या दोन वर्षांच्या कार्यकाळातील सर्वच कामाची चौकशी करण्यासाठी निफाड व चांदवडच्या दोन उपजिल्हाधिकारी व दोन लेखाधिकाºयांची नेमणूक केली असून, त्यांनी जवळपास दहा ते बारा मुद्दाच्या आधारे चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.निव्वळ योगायोग की...?नाशिक जिल्हा महसूल प्रशासनात काही विशिष्ट व्यक्तींना टार्गेट केले जात असल्याच्या आजवरच्या होणाºया चर्चेला विनोद भामरे यांच्या सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या कृत्यामुळे पृष्टी मिळाली असून, औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांवर अशाच प्रकारे राजेंद्र कटके या उपजिल्हाधिकाºयांनी आरोप केले आहेत. नाशिक जिल्ह्णात बागलाण व नाशिक तहसीलदारांनादेखील वेळोवेळी वरिष्ठांकडून दुय्यमपणाची वागणूक देण्यात आल्याचे बोलले जात असल्याने त्यात भामरे यांची भर पडल्याने हा निव्वळ योगायोग की अधिकाºयांची अकार्यक्षमता हे समजू शकले नसले तरी, महसूल प्रशासनात काही विशिष्ट अधिकाºयांवर दाखविली जाणारी मर्जी व काहींना दिल्या जाणाºया जाणीवपूर्वक त्रासाचे अनेक किस्से कर्मचारी व अधिकारी रंगवून सांगत आहेत.
निफाडचे तहसीलदार सक्तीच्या रजेवर अकार्यक्षमतेचा ठपका : चौकशीसाठी समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 1:20 AM
नाशिक : शासकीय कामकाजात केलेली अनियमितता व वसुलीत उदासीनता दाखविल्याने निफाडचे तहसीलदार विनोद भामरे यांना जिल्हाधिकाºयांनी सक्तीने रजेवर पाठविले आहे.
ठळक मुद्देदोन दिवसांत अहवाल देण्याचे बंधनकारकसक्तीने रजेवर पाठविण्याच्या सूचना