शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठी निफाडला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 9:43 PM

निफाड तालुका सकल धनगर समाज समितीच्या वतीने धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा या व इतर मागण्यांसाठी सोमवारी निफाड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

निफाड : निफाड तालुका सकल धनगर समाज समितीच्या वतीने धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा या व इतर मागण्यांसाठी सोमवारी निफाड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.  येथील अकोलखास गल्लीतील बिरोबा मंदिरापासून मोर्चास प्रारंभ झाला. मोर्चाच्या अग्रभागी वाद्यवृंद होता तसेच मेंढ्यांचा कळप आणण्यात आला होता. मोर्चा निफाड तहसील कार्यालय येथे आल्यानंतर सभा घेण्यात आली. याप्रसंगी जिल्हा ग्रामीण धनगर आरक्षण संघर्ष समितीचे उपाध्यक्ष भाऊसाहेब ओहोळ, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष शिवाजी ढेपले, निफाडचे नगरसेवक अनिल कुंदे, निफाडचे माजी नगराध्यक्ष मुकुंद होळकर, दत्तात्रय सुडके, रामनाथ पल्हाळ यांची भाषणे झाली. मोर्चेकऱ्यांच्या वतीने तहसीलदार दीपक पाटील यांना निवेदन देण्यात आले. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा, सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकरांचे नाव द्यावे, शहीद परमेश्वर धोंडगे यांच्या कुटुंबीयांना पंचवीस लाखांची मदत द्यावी, धनगर समाजातील तरु णावर आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनाप्रसंगी झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे, धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती तत्काळ मिळावी, धनगर समाजातील मेंढपाळांना मेंढ्या चारण्यासाठी गायरान जमिनी उपलब्ध करून द्याव्यात आदी मागण्या निवेदनाव्दारे करण्यात आल्या आहेत. याप्रसंगी दत्तू सुडके, शिवाजी सुपनर, संतोष पल्हाळ, भाऊसाहेब फटांगरे, बाबासाहेब शिंदे, गोरख गाढे, भास्कर ढेपले, शंकर ढेपले, चंद्रकांत पानसरे, अनुप वन्से, शरद ढेपले, भाऊसाहेब साबळे आदींसह धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक