सिन्नर : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने नाफेडमार्फत ७०० ते ९०० रुपये दराने कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या दरात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघणार नसल्याने नाफेडने दोन हजार रुपये प्रतिक्विंंटल दराने शेतकºयांकडून कांदा खरेदी करावा, अशी मागणी सिन्नर बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ भिसे यांनी केली आहे.राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी दरातील चढउतार आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान यामुळे मेटाकुटीला आला आहे. प्रतिकूल परिस्थितीत कांद्याचे उत्पन्न घ्यायचे आणि बाजारात मातीमोल किमतीला तो विकायचा. यातून उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकºयांवर आर्थिक नुकसान सोसण्याची वेळ आली आहे. सद्यस्थितीत उन्हाळ कांदा बाजारात विक्रीसाठी येत असून, ४०० ते ९०० रुपये दराने तो खरेदी केला जात आहे. यामुळे होणाºया नुकसानीमुळे शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शासनाने नाफेडमार्फत कांदा खरेदी करण्याची घोषणा केली आहे. ही खरेदी ५०० ते ९०० रुपये प्रतिक्विंंटल दराने करण्यात येईल, असे सांगितले जाते. वास्तविक क्विंंटलभर कांदा उत्पादन करायचा म्हटला तरी साधारणपणे दीड हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. खते, बी-बियाणे मशागतीसाठी मजूर अशी तजवीज केल्यावर वेळेवर पाणी देण्यासाठी शेतकºयांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. एवढे कष्ट उपसल्यावर हाताशी आलेले उत्पादन जर ४०० ते ९०० रुपयांपर्यंत खरेदी केले जात असेल तर शेती न केलेली बरी अशी शेतकºयाची धारणा झाली आहे. शेतकºयाचा कांदा लागवडीचा खर्च भरून निघावा व त्याच्या हाती दोन पैसे वाढवून मिळावेत यासाठी शासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.----------------------------------नाफेड मार्फत कमी दराने कांदा खरेदी करून शासन शेतकºयांची थट्टा करत आहे, असा आरोप भिसे यांनी केला आहे. कांदा उत्पादक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी नाफेडमार्फत होणारी कांदा खरेदी २००० रुपये प्रतिक्विंंटल दराने करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
‘नाफेड’ने दोन हजार दराने कांदा खरेदी करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 9:50 PM