येवला : नागडे ग्रामपंचायतीने गावातील ९० टक्के अतिक्रमण भुईसपाट केल्याने कागदावरची लांबलेली लढाई प्रत्यक्षात आली आहे. गेल्या दोन दिवसापासून युद्धपातळीवर सुरू असलेली ग्रामपातळीवरची मोठी मोहीम ग्रामपंचायतीने पूर्ण केल्याचा दावा केला आहे. नागडे ग्रामपंचायतीतील बऱ्याच दिवसांपासून अतिक्र मणाबाबत रखडलेला मुद्दा ऐरणीवर आला असून, ग्रामपंचायतीने या आधी ३१ डिसेंबरपूर्वी अतिक्र मण काढेल नाही तर ग्रामपंचायत विघटित करण्याचा ठराव गटविकास अधिकाऱ्याने पाठवावा अन्यथा यात दिरंगाई झाल्यास गटविकास अधिकाऱ्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविणार असल्याचा सज्जड लेखी आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्याने, नागडे गावातील ग्रामस्थांनी स्वेच्छेने ४० टक्क्यापर्यंतची अतिक्र मणे सोमवारी काढली होती. दरम्यान बुधवारी ३० डिसेंबर रोजी ९० टक्के अतिक्र मण काढले असल्याबाबतचा दावा नागडे ग्रामपंचायतीने केला आहे. ग्रामविकास अधिकारी भगवान गायके, विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर सपकाळे, ज्ञानेश्वर कऱ्हाळे, सहा. स्थापत्य अभियंता अंबादास शेंद्रे यांनी स्वत: अतिक्र मण मोहीम राबवली. जेसीबी, ट्रॅक्टर, पोलीस बंदोबस्त, ग्रामपंचायत कर्मचारी व मजूर मोठ्या प्रमाणात या मोहिमेत सहभागी होते.
नागडे येथील अतिक्र मणे जमीनदोस्त
By admin | Published: January 02, 2016 10:42 PM