चांदोरी : नागापूर फाटा परिसरातील इंगोले वस्ती येथे विहीर परिसरात बिबट्याच्या मादी दोन बछड्याना जन्म दिला होता. त्यातील एक बछडा गुरुवारी विहिरीच्या कपारीत अडकला. त्या बछड्याला सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले.चांदोरी परिसरात काही दिवसांपासून बिबट्या मादीचा संचार असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच वनविभागास कळविले होते. त्यानुसार त्यांनी दखल घेत गुळवे वस्ती येथे पिंजरा बसविला आहे. मंगळवारी बिबट्या मादीने प्रकाश इंगोले यांच्या विहीर परिसरात दोन बछड्याना जन्म दिला. त्यातील एक बछडा गुरुवारी विहिरीमध्ये कपारीमध्ये अडकल्याचे स्थानिकांना समजताच त्यांनी वनविभागास कळविले.वनविभागाचे अधिकारी, वनक्षेत्रपाल, वनसेवक पिंजऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. योग्य त्या सूचना देत कामास सुरुवात केली. बछडा थकला असल्याने विहिरीतील कपारीमध्ये बसला होता. वनविभागाने सलग ६ तास मोहीम राबवून बछड्याला सुखरूप विहिरी बाहेर काढण्यात आले. वनक्षेत्रपाल संजय भंडारी, वनसेवक भय्या शेख तसेच स्थानिक तरुण अतुल पेखले, शरद इंगोले, प्रकाश इंगोले, संदीप टर्ले, अनिरुद्ध टर्ले, रोहित पळसकर, नितीन खेलूकर आदींनी सहकार्य केले.वनविभागाने प्रथम पिंजरा विहिरीमध्ये सोडला व त्यामध्ये खाद्य ठेवले. जेणेकरून तो बछडा पिंजºयात येईल, तो प्रयत्न अपयशी ठरला. त्यानंतर धुराचा प्रयोग केला; परंतु तरीही बाहेर न आल्याने अखेरीस बाहेरून ट्रॅक्टर पिस्टनच्या साह्याने पाण्याचा वेगाने फवारा केला.
नागापूरला बछडा ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 10:49 PM
चांदोरी : नागापूर फाटा परिसरातील इंगोले वस्ती येथे विहीर परिसरात बिबट्याच्या मादी दोन बछड्याना जन्म दिला होता. त्यातील एक बछडा गुरुवारी विहिरीच्या कपारीत अडकला. त्या बछड्याला सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले.
ठळक मुद्देधुराचा प्रयोग केला