नाशिक : जिल्ह्णातील सहा नगरपंचायत निवडणुकीसाठी गुरुवारपासून नामांकन दाखल करण्यास सुरुवात केली जाणार असून, ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे उमेदवारांना राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर ‘आॅनलाइन’ अर्ज भरावे लागणार आहेत. पहिल्यांदाच होत असलेल्या या निवडणुकीसाठी आयोगाने अनेक नियमांमध्ये बदल केल्याने ही निवडणूक खऱ्या अर्थाने रंगणार आहे. जिल्ह्णातील कळवण, पेठ, सुरगाणा, देवळा, चांदवड व निफाड या सहा ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीत रूपांतर करण्यात आल्याने तीन दिवसांपूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करून या नगरपंचायतींच्या हद्दीत आचारसंहिताही जारी केली आहे. गुरुवार, दि. १ आॅक्टोबरपासून या निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यास सुरुवात केली जाणार असून, नामांकन अर्ज व शपथपत्र हे दोन्हीही आॅनलाइन भरून त्याची प्रिंट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर करावयाची आहे.नामांकन दाखल करण्याच्या पूर्वसंध्येला प्रत्येक नगरपंचायतीत सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्या त्या भागातील राजकीय पक्ष प्रमुखांची संयुक्त बैठक घेऊन त्यांना निवडणुकीबाबत, तसेच निवडणूक आचारसंहितेच्या पालनाबाबत माहिती दिली.
नगरपंचायत निवडणुकीसाठी आजपासून
By admin | Published: October 01, 2015 12:12 AM