देवळा : देवळा नगरपंचायत कर्मचारी संघटनेने (सिटू संलग्न) रोजंदारी, कंत्राटी व कायम कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी दि. १ जानेवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केल्यामुळे देवळा नगरपंचायतीचे कामकाज ठप्प झाले आहे.सिटू संलग्न संघटनेच्या वतीने राज्यात पुकारलेल्या आंदोलनात देवळा नगरपंचायत कर्मचारी संघटना सहभागी झाली आहे. दि. १८ डिसेंबर रोजी राज्यातील नगरपालिका, नगरपरीषद, व नगरपंचायत कर्मचार्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी एक दिवस काम बंद आंदोलन केले होते, तसेच मुंबई येथे मंत्रालयावर मोर्चा काढला होता. मुख्यमंत्री नरेंद्र फडणवीस यांना निवेदन देउन ३१ जानेवारीपर्यंत त्यांच्या मागण्यांवर निर्णय न झाल्यास १ जानेवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. परंतु शासनाने याबाबत कार्यवाही न केल्यामुळे देवळा नगरपंचायत कर्मचार्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनात जिल्हा सदस्य सुधाकर अहेर, सुरेश अहेर, वसंत अहेर, दत्तात्रय बच्छाव, राजेंद्र साळुंखे, शांताराम धुळे, गुलाब शिरसाठ, दिपक गोयल, भाऊसाहेब साबळ , राजेंद्र शिलावट, किरण गुजरे, सुनिल शिलावट, धनुबाई गोयल, हौसाबाई साळुंखे, विमल देवरे, सुशिला घोडेस्वार, संगीता सोनगत, जागृती गोयल आदी नगरपंचायत कर्मचारी सहभागी झाले आहेत.शासनाचे मागण्यांकडे दुर्लक्षपेठ -शासनाने नगरपंचायत कर्मचार्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने सीटू प्रणति कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली पेठ नगरपंचायत कर्मचार्यांनी नवीन वर्षाच्या पिहल्या दिवसापासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केल्याने शहरातील पाणीपरवठा, स्वच्छता या सारख्या अत्यावश्यक सेवा कोलमडल्या आहेत. राज्यात नव्याने निर्मित झालेल्या नगरपंचायतीत पूर्वीच्या ग्रामपंचायत कार्यरत कर्मचार्यांचे समायोजन करणे , नगरपंचायत कर्मचार्यांचे प्रश्न सोडविणे या व इतर मागण्यांचे पूर्ततेसाठी पेठ नगरपंचायतीचे १७ कर्मचारी व रोजदारीवरील सफाई कामगार यांनी सिटूप्रणीत डॉ .डी. एल . कराड यांचे आदेशान्वये बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. याप्रसंगी तालुकाध्यक्ष गोविंद गाढवे , सरचिटणीस भरत चव्हाण, उपाध्यक्ष शाकीब राजे , जनार्दन गायकवाड यांचे नेतृत्वाखाली १७ कर्मचारी यांनी नगरपंचायती समोर आदोलन सुरु केल्याने नागरी सेवा , प्रशासकीय सेवा कोलमडली आहे .