मालेगाव (जि. नाशिक) : गेल्या काही दिवसांपासून प्रतिष्ठेची ठरलेली विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदार-संघातील टीडीएफची उमेदवारी नगरचे भाऊसाहेब कचरे यांना जाहीर झाली आहे. टीडीएफचे कार्याध्यक्ष फिरोज बादशाह यांनी कचरे यांच्या नावाची घोषणा सोमवारी केली.विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघातून तिकीट मिळविण्यासाठी टीडीएफमध्ये मोठी चढाओढ होती. ही निवडणूक येत्या जुलैमध्ये होत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन-तीन महिन्यांपासून मोर्चेबांधणी सुरू होती. विभागामध्ये दहा इच्छुक उमेदवार होते.इच्छुक उमेदवारांनी जिल्ह्यात मेळावे घेऊन शक्तिप्रदर्शन केले होते. मात्र उमेदवार निवडीचे अधिकार महाराष्टÑ टीडीएफचे कार्याध्यक्ष फिरोज बादशाह यांना देण्यात आले होते.त्यानुसार बादशाह व शिवाजी निरगुडे यांच्या उपस्थितीत सोमवारी येथे बैठक झाली. या बैठकीत बादशाह यांनी शिक्षक मतदार संघातून टीडीएफचे उमेदवार म्हणून भाऊसाहेब नारायण कचरे यांच्या नावाची घोषणा केली आहे.बैठकीस कचेश्वर बारसे, के. एन. अहिरे, रईस अहमद, भाऊसाहेब कचरे, बी. आर. पाटील, मोहन चकोर, भाऊसाहेब शिरसाठ एस. बी. देशमुख, हेमंत पाटील, सुभाष शिंदे, रामराव बनकर, अरुण पवार, पी. जी. देवरे, मंगेश सूर्यवंशी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.बादशहांना अधिकार१० फेब्रुवारी रोजी धुळे येथे निवडीसाठी बैठक बोलवण्यात आली होती. बैठकीस निवड समितीचे प्रतिनिधी, अध्यक्ष सुभाष कुलकर्णी, प्रा. के. एन. अहिरे, बाळासाहेब सूर्यवंशी, शंकर जोरवेकर, एस. जी. इंगळे, रईस अहमद यांच्या समोर इच्छुक उमेदवारांनी आमची मुलाखत न घेता निवड समितीने निर्णय घ्यावा, निवडीचे सर्व अधिकार फिरोज बादशाह यांना द्यावे असे ठरले होते.
नगरच्या भाऊसाहेब कचरे यांना टीडीएफची उमेदवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:36 AM
मालेगाव (जि. नाशिक) : गेल्या काही दिवसांपासून प्रतिष्ठेची ठरलेली विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदार-संघातील टीडीएफची उमेदवारी नगरचे भाऊसाहेब कचरे यांना जाहीर झाली आहे. टीडीएफचे कार्याध्यक्ष फिरोज बादशाह यांनी कचरे यांच्या नावाची घोषणा सोमवारी केली.
ठळक मुद्दे शिक्षक मतदारसंघपदाधिकाºयांच्या बैठकीनंतर घोषणा