शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

नाशिकमध्ये प्रस्तावित हॉकर्स झोनला नगसेवकांनी घेतला आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 8:03 PM

महापालिका : स्वतंत्र महासभा घेण्याचा निर्णय

ठळक मुद्देमहापालिका क्षेत्रात फेरीवाल्यांचे नियंत्रण व नियमन करण्यासाठी उपविधीचा मसुदा मंजूर करण्याचा प्रस्ताव महासभेत ठेवण्यात आला होतासदर आराखड्यात सुधारणा करण्याची गरज असून त्यासाठी विशेष महासभा बोलाविण्याची सूचना

नाशिक - महापालिकेच्या बुधवारी (दि.३) झालेल्या महासभेत प्रस्तावित हॉकर्स झोनला सदस्यांनी तिव्र आक्षेप घेत त्यात सुधारणा करण्याची मागणी केली. दरम्यान, हॉकर्स झोनसाठी स्वतंत्र महासभा बोलाविण्याचा निर्णय महापौर रंजना भानसी यांनी जाहीर केला.महापालिका क्षेत्रात फेरीवाल्यांचे नियंत्रण व नियमन करण्यासाठी उपविधीचा मसुदा मंजूर करण्याचा प्रस्ताव महासभेत ठेवण्यात आला होता. परंतु, त्याला सदस्यांनी आक्षेप घेतला. गुरुमित बग्गा यांनी सांगितले, हॉकर्स झोन निश्चित करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात आलेले नाही. ज्याठिकाणी गरज नाही तेथे हॉकर्स झोन पाडण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. सदर आराखड्यात सुधारणा करण्याची गरज असून त्यासाठी विशेष महासभा बोलाविण्याची सूचनाही बग्गा यांनी केली. तोपर्यंत सदर उपविधी मसुद्यास मंजूरी देऊ नये, अशी भूमिका घेण्यात आली. मात्र, प्रशासन उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी सदर मसुदा आणि हॉकर्स झोनचा आराखडा यांचा काही संबंध नसून ती नियमावली असल्याने त्यास मंजुरी देण्यास काहीच हरकत नसल्याचे सांगितले. सभागृहनेता दिनकर पाटील यांनीही याबाबत स्वतंत्र महासभा बोलाविण्याची सूचना केली. त्यानुसार, महापौरांनी हॉकर्स झोनमध्ये सुधारणा करण्यासाठी महासभा घेण्याचे जाहीर केले. दरम्यान, महासभेत वैद्यकीय विभागाने ठेवलेल्या मानधनावर व आऊटसोर्सिंगद्वारे भरतीच्या प्रस्तावालाही विरोधकांनी विरोध दर्शविला. डॉक्टरांची मानधनावर भरती करण्याबाबतचे रोस्टरच सदस्यांना देण्यात आले नसल्याने सदरचा प्रस्ताव पुन्हा पुढच्या महासभेत सादर करण्याची सूचना डॉ. हेमलता पाटील यांनी केली. मानधनावर दोन बायोमेडिकल इंजिनिअरची पदे भरती करण्याबाबतही विरोधकांनी आक्षेप घेतला. गुरुमित बग्गा यांनी सदरची भरती करण्याऐवजी मेंटेनन्सचे कंत्राट काढण्याची सूचना केली. अखेर महापौरांनी सदरचा प्रस्ताव पुन्हा पुढच्या महासभेवर ठेवण्याचे आदेश दिले.घंटागाडीप्रश्नी सदस्य आक्रमकसिडको प्रभाग समितीचे सभापती सुदाम डेमसे यांनी घंटागाडी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा ठराव तीन महिन्यांपूर्वी प्रभाग समितीने करुनही दखल घेतली जात नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. सदर घंटागाडी ठेकेदाराला न्यायालयात जाण्यासाठी प्रशासनाने वेळ दिल्याचा आरोपही डेमसे यांनी केला. भागवत आरोटे, डी. जी. सूर्यवंशी यांनीही ठेकेदाराच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली. परंतु, महासभेतही त्याबाबत समाधानकारक उत्तर सदस्यांना मिळू शकले नाही.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका