नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत नवनिर्माण विकास पॅनलने एकतर्फी बहुमत मिळवत सत्ताधारी पॅनलचा धुव्वा उडवत सत्ता हस्तगत केली होती. शुक्रवारी (दि.१२) झालेल्या निवडीप्रसंगी सरपंचपदासाठी सौ. कासलीवाल व उपसरपंचपदासाठी अहिरे यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी मोटे, तलाठी गिरी व ग्रामसेवक भाबड यांनी केली. याप्रसंगी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य डॉ. प्रीतम वैद्य, अल्केश कासलीवाल, सागर सोनवणे, राजाराम पवार, सविता टिटवे हे उपस्थित होते, तर पॅनलचे मार्गदर्शक बाबूशेठ कासलीवाल, त्र्यंबक बडे, चंद्रभान व्यापारे, शांताराम पवार, शिवाजी व्यापारे, हरिभाऊ चव्हाण, मोतीराम वैद्य, केदू सोनवणे, राणूबा वैद्य, नारायण वैद्य, तावबा सोनवणे, दत्तू सोनवणे आदींच्या पुढाकाराने बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाले.
यावेळी बाळासाहेब चव्हाण, चेतन कासलीवाल, भगवान जाधव, रमेश देवकर, बाळू जाधव, अप्पा सोनवणे, उत्तम देवकर, संतोष सोनवणे, अशोक देवकर, राजेंद्र लालसिंग परदेशी, सागर परदेशी, मुकेश परदेशी, जितेंद्र गायकवाड, मयाराम नवले, रोहिदास भिडे, मारुती वैद्य, शंकर चव्हाण, शरद वैद्य, दीपक वाघ आदी समर्थक उपस्थित होते. निकालानंतर कै. चंद्रकांत वैद्य यांच्या प्रतिमेचे पूजन करून समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करीत गावात जंगी मिरवणूक काढली.
इन्फो -
कासलीवाल कुटुंब दहाव्यांदा ग्रामपंचायतीत!
अनकाई ग्रामपंचायतीत बाबूशेठ कासलीवाल हे १९८४ पासून ५ वेळा अन् नगिना कासलीवाल या तिसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. बाबूशेठ हे १७ वर्ष उपसरपंच तर ४ वर्ष सरपंच होते. यावेळच्या निवडणुकीत कुटुंबातील अल्केश कासलीवाल व त्यांच्या मातोश्री नगिना कासलीवाल दोघेही मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले असून त्यांनी मायलेक निवडून येण्याचा इतिहास रचला.
===Photopath===
160221\16nsk_38_16022021_13.jpg
===Caption===
अनकाईत सरपंच, उपसरपंच निवडीनंतर जल्लोष करताना कार्यकर्ते.