शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

दोन लाख विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 6:46 PM

नाशिक : महाराष्ट्र  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवार, दि. ८ रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार असून, विभागातील सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांचे या निकालाकडे लक्ष लागून आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर आॅनलाइन निकाल पाहाता येणार आहे. यासाठी मंडळाने तीन अधिकृत संकेतस्थळे जाहीर केली आहेत.

ठळक मुद्देआज दहावीचा निकाल : नाशिक जिल्ह्यातील ९६ हजार विद्यार्थीनिकालाची प्रिंटआउटदेखील काढता येणार

नाशिक : महाराष्ट्र  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवार, दि. ८ रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार असून, विभागातील सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांचे या निकालाकडे लक्ष लागून आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर आॅनलाइन निकाल पाहाता येणार आहे. यासाठी मंडळाने तीन अधिकृत संकेतस्थळे जाहीर केली आहेत.मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेसाठी नाशिक विभागातील २ लाख १० हजार ७८२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक ९६,१९२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. धुळे जिल्ह्यातील ३०,२४९, जळगाव जिल्ह्यातील ६३,१५९ आणि नंदुरबार जिल्ह्यातील २१,१८२ विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे.विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहाता येणार आहे. तसेच निकालाची प्रिंटआउटदेखील काढता येणार आहे. मोबाइलवरूनदेखील निकाल पाहण्याची सुविधा बीएसएनएलने उपलब्ध करून दिली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना एमएचएसएससी स्पेस सीटनंबर टाइप करून ५७७६६ या क्रमांकावर पाठवायचे आहे.आॅनलाइन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासूनच विद्यार्थी अधिकृत गुणपत्रकाची वाट न पाहता गुणपडताळणी व छायांकित प्रतींसाठी अर्ज करू शकणार आहेत. यासाठी आवश्यक तो अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेला आहे. अधिक माहिती हवी असल्यास विद्यार्थी नाशिक विभागीय मंडळाशीदेखील संपर्क करू शकणार आहेत. पुनर्मूल्यांकनासाठी मात्र विद्यार्थ्यांना मात्र प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळविणे अपेक्षित आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दुसºया दिवसापासून पुढील पाच दिवसांत विद्यार्थी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकतात.

टॅग्स :Nashikनाशिकeducationशैक्षणिकSSC Results 2018दहावी निकाल २०१८