नाशिक: कोरोनापासून काहीसा दिलासा मिळाल्यानंतर जिल्ह्यातील निर्बंध शिथिल होताच नाशिककर घराबाहेर पडल्याने शहरातील रस्त्यांवर सकाळपासूनच मोठी गर्दी झाली. बाजारपेठेत खरेदीसाठी वर्दळ वाढली तर रस्त्यांवर वाहनांची कोंडी देखील झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या. शहरातील प्रमुख बाजारपेठांबरोबरच इतर उपनगरांमधील रस्त्यांवर गर्दी उसळली होती. जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या कमी होत असल्याने मंगळवार (दि.१) पासून व्यवहार खुले करण्यास जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली. सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्वच प्रकारची दुकाने सुरू झाल्यामुळे निर्धारीत वेळत खरेदी उरकण्यासाठी बाजारपेठेत झुंबड उडाली. जिल्ह्यातील व्यवहार सुरू झाल्यामुळे व्यापारी, व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले असले तरी बाजारातील तुडूंब गर्दीमुळे प्रशासनाला मात्र कोरोना वाढण्याची चिंता लागली आहे.शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या मेनरोड, रविवार कारंजा तसेच भद्रकाली मार्केटमध्ये सकाळापासूनच ग्राहकांची वर्दळ दिसून आली. भद्रकाली मार्केटमध्ये पावसाळी कामांसाठी लागणारे साहित्य खरेदी करणाऱ्यांची गर्दी झाली होती तर रविवार कारंजा येथील किराणा बाजारात सकाळपासूनच गर्दी झाली होती. महात्मा गांधी रोडवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या तर शालिमार येथील जुन्या तिबेटीयन मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी झाली होती.
निर्बंध शिथील होताच नाशिककर पडले घराबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 4:04 PM
जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या कमी होत असल्याने मंगळवार (दि.१) पासून व्यवहार खुले करण्यास जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली. सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्वच प्रकारची दुकाने सुरू झाल्यामुळे निर्धारीत वेळत खरेदी उरकण्यासाठी बाजारपेठेत झुंबड उडाली.
ठळक मुद्दे मेनरोड, रविवार कारंजा तसेच भद्रकाली मार्केटमध्ये सकाळापासूनच ग्राहकांची वर्दळभद्रकाली मार्केटमध्ये पावसाळी कामांसाठी लागणारे साहित्य खरेदी करणाऱ्यांची गर्दी