आढावा बैठक: जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्राथमिक चर्चानाशिक: पुरातन काळापासून ते स्मार्ट नाशिकपर्यंतच्या प्रवासात नाशिक समृद्ध होत आले आहे. जिल्ह्याच्या अंतरंगाची माहिती समाविष्ट असलेला जिल्हाकोष लवकरच तयार करण्यात येणार असून यासाठी आयोजित पहिल्याच बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाकोष निर्मितीचा आढावा घेतला. पौराणिक, ऐतिहासिक अशी ओळख असलेल्या नाशिकच्या विकासाच्या प्रवासाचे टप्पे यामध्ये देण्यात येणार असून दोन खंडात जिल्ह्याचा इतिहास शद्धबद्ध केला जाणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या गॅझिटिअर समितीच्या बैठकीप्रसंगी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी अनेक सुचना केल्या. तसेच समितीच्या कामकजाचीही माहिती घेतली. यावेळी दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक व सचिव डॉ. दिलीप बलसेकर, अपर जिल्हाधिकारी निलेश सागर, नाशिक इतिहास संशोधन मंडळाचे सदस्य चेतन राजापूरकर, दुर्ग अभ्यासक राम खुर्दळ, माळोदे, आदिंसह प्रशासकीय विभागाचे प्रमुख उपस्थितीत होते.दर्शनिका विभगाामार्फत प्रत्येक जिल्ह्याचा जिल्होकोश अर्थात गॅझेट तयार केले जाते. जिल्हाकोष तयार करतांना त्यात नाशिक जिल्ह्याविषयी सर्वंकश अधिकृत अशी माहिती प्रसिद्ध केली जाते. यात समाविष्ट होणारी माहिती आणि कामकाजासंदर्भातील चर्चा यावेळी करण्यात आली. या जिल्हा कोषमध्ये काय असले पाहिजे याविषयी सविस्तर सादरीकरण करण्यात आले. या जिल्हाकोषमध्ये जिल्ह्याची भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिक, रुढी परंपंरा, चालिरिती, अर्थव्यवस्था, महसूल, प्रशासन, वनसंपदा, पर्यटनस्थळे, नद्या, संस्कृती, कृषी, उद्योग अशा अनेविध विषयांची माहिती समाविष्य केली जाणार असल्याने यासाठी लागणारे सहकार्य प्रत्येक विभागाने करावे अशा सुचना जिल्हाधिकाºयांनी यावेळी दिल्या.ब्रिटीशांना जिल्ह्याची ओळख व्हावी यासाठी त्यांनीच हा उपक्रम सुरू केला होता. नाशिक जिल्ह्यासाठीचे पहिले गॅझेट १८८३ मध्ये तयार करण्यात आले होते.त्यानंतर १९७५ मध्ये काही दुरूस्त्त्या करण्यात आल्याचे बेलसेकर यांनी सांगितले.
समृद्ध नाशिकचा ‘जिल्हाकोष’ होणार तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2020 4:50 PM