कांदा अनुदान कालावधी मार्चपर्यंत करण्याची शेतकऱ्यांची मागणीनायगाव : गेल्या महिन्यात शेतकऱ्यांना अल्पदराने कांदा विक्री करावी लागल्याने उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जानेवारीपर्यंत दिलेल्या अनुदानाचा कालावधी मार्च महिन्या पर्यंत करण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकºयांना केली आहे.अतिशय प्रतिकुल परिस्थतीत पिकविलेल्या कांद्याला बाजारात मातीमोल बाजारभाव मिळत असल्यामुळे उत्पादन खर्चही वसुल होत नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाने विविध ठिकाणी आंदोलन केले होते. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शासनाने ३१ जानेवारी पर्यंत विक्र ी केलेल्या प्रत्येक शेतकºयाला दोनशे क्विंटल पर्यंत प्रती क्विंटल २०० रूपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकºयांना काही अंशी दिलासा मिळणार आहे.राज्य शासनाने राज्यातील कांदा उत्पादक शेतकºयांना अनुदान देतांना अनेक अटी-शर्ती घालुन अनुदान जाहीर केल्याने अनेक कांदा उत्पादक शेतकरी या अनुदानापासुन वंचित राहिले आहे.नोव्हेंबर,डिसेंबरव जानेवारी या तीन महिन्यांच्या तुलनेत फेब्रुवारी व मार्च या महिन्यात मोठया प्रमाणात कांदा विक्री झाली आहे. फेब्रुवारी प्रमाणेच मार्च महिन्यातही कांद्याला यंदाच्या हंगामातील सर्वात कमी बाजारभाव आजही मिळत आहे.मात्र शासनाने ३१ जानेवारी पर्यंतच अनुदान जाहीर केल्याने या अनुदानापासुन मोठया प्रमाणावर शेतकरी वंचित राहणार असल्याने शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे. शासनाने कांदा उत्पादक शेतकºयांना अनुदानाच्या रूपाने दिलासा देतांना क्विंटलच्या मर्यादे बरोबर कालावधीचीही अट घातली आहे. क्विंटलची मर्यादा असल्यामुळे ३१ जानेवारी ही विक्र ीच्या कालावधीची अट मार्च महिन्यापर्यंत करण्याची मागणी अनुदानापासुन वंचित राहिलेल्या शेतकºयांनी केली आहे.कांदा उत्पादक शेतकºयांना दिलासा देतांनाही शासनाने अनेक अटी घातल्यामुळे उत्पादक शेतकरी या अनुदानापासुन वंचित राहिले आहे. डिसेंबर व जानेवारी च्या तुलनेत फेब्रुवारी व मार्च मध्ये मोठया प्रमाणावर शेतकºयांनी कांदा अत्यल्प भावात विक्री केला आहे. या हंगामातील निच्यांकी भावाने कांदा विक्री केलेले शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहे. शासनाने अनुदान मिळण्याचा कालावधी मार्च पर्यंत केला तरच बहुतांशी शेतकºयांना या अनुदानाचा लाभ घेता येईल- रविंद्र कापडी, कांदा उत्पादक देशवंडी.डिसेंबर व जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी व सध्या कांद्याला अल्प बाजारभाव मिळत आहे. अशा शेतकºयांना शासनाचे अनुदान मिळाले तर कांदा उत्पादकांना ख-या अर्थाने शासनाच्या अनुदानाचा फायदा होईल. क्विंटलची मर्यादा असतांनाही कालावधीची अट घातल्यामुळे अनेक शेतकरी आजही या अनुदानापासुन वंचित आहे.- विलास काकड, कांदा खरेदीदार, नायगाव उपबाजार.
नायगाव : डिसेंबर व जानेवारीच्या तुलनेत सद्या अल्प बाजारभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 6:04 PM
नायगाव : गेल्या महिन्यात शेतकऱ्यांना अल्पदराने कांदा विक्री करावी लागल्याने उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जानेवारीपर्यंत दिलेल्या अनुदानाचा कालावधी मार्च महिन्या पर्यंत करण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकºयांना केली आहे.
ठळक मुद्देकांदा अनुदान कालावधी मार्चपर्यंत करण्याची शेतकऱ्यांची मागणी