लोकमत न्यूज नेटवर्कसायखेडा : नायगाव-पिंपळगाव निपाणी रस्त्यावर पिंपळगावपासून थोड्याच अंतरावर मोरीजवळील रस्ता खचला असून, याकडे बांधकाम विभाग डोळेझाक करत आहे. दोन तालुक्यांना जोडणारा रस्ता असल्याने नेहमीच वर्दळ असते, तसेच रात्री- अपरात्री शेतकरी, नागरिक यांना रस्त्याने प्रवास करावा लागतो. यावेळी अनेकदा रस्त्याचा अंदाज येत नसल्याने गाडी खड्ड्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्ता खचलेल्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणताही सूचना फलक अथवा स्पीड ब्रेकर टाकलेला नाही अथवा निशाणी लावलेली नसल्याने खचलेल्या रस्त्याचा अंदाज येत नाही त्यामुळे ग्रामस्थांना व वाहनचालकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे.निफाड-सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या पिंपळगाव निपानी या गावाला जोडनारा तसेच दोन तालुक्यांना जोडनारा नायगांव-पिंपळगाव निपानी रस्त्याने मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रस्ता खचल्याने या भागातील वाहन धारक तारेवरची कसरत करत आहे. एकपदरी रस्ता असल्याने या रस्त्याने प्रवास करने धोकादायक बनले आहे. रस्ता खचुनही या ठिकाणी कोणताही भरावा संबधितांकडुन टाकला जात नसल्याने ग्रामस्थांना धोका पत्करावा लागत आहे. नायगांव येथे कांदा मार्केट असल्याने या रस्त्याने शेतकऱ्यांची वर्दळ असते. या ठिकाणी खचलेल्या रस्त्याकडे संबधितांनी लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
नायगाव-पिंपळगाव निपाणी रस्ता खचला
By admin | Published: July 05, 2017 11:38 PM