नाशिक : सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील तलाठी मनोज किसन नवाळे याला १३ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी न्यायालयाने पाच वर्ष सक्तमजुरी व १० हजारांचा दंड ठोठावला आहे. तक्रारदार यांचे आई व वडिलांनी ब्राह्मणवाडे शिवारात १० गुंठे शेती विकत घेतली होती. महसुली दप्तरात नोंद घेण्यासाठी तलाठी मनोज नवाळेने १३ हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात (एसीबी) तक्रार दिली. त्यानंतर १४ ऑगस्ट २०१३ ला पथकाने मनोज नवाळेला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. १५ ऑगस्ट २०१३ गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्यात आले होते. या घटल्यात शुक्रवारी (दि. ०५) अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस. नायर यांनी निकाल देताना मनोज नवाळे याला भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरवत ५ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिनेकारावासाची शिक्षा सुनावली आहे.
भ्रष्टाचार प्रकरणात नायगावच्या तलाठ्याला ५ वर्ष सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 1:26 AM