शहरं
Join us  
Trending Stories
1
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के
2
आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील!
3
भीषण आगीत सिलेंडरचा स्फोट; चार दुकाने जळून खाक! मुंब्रा-शिळफाटा परिसरातील घटना
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: एकीकडे अब्दुल सत्तार यांना दणका, दुसरीकडे अरविंद सावंतांवर गुन्हा
5
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 
6
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह
7
मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ
8
शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड
9
सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा : मनोज जरांगे पाटील
10
निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण
11
मुहूर्ताला मुंबई शेअर बाजारात तेजीचे फटाके; सोने-चांदीच्या भावात घसरण
12
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचाही राज्यात धडाका 
14
महायुती, मविआला अपक्षांचे आव्हान?  मुंबईतील दहा मतदारसंघांत उमेदवारांना टेन्शन
15
शिष्यवृत्तीला उशीर झाल्यास विद्यापीठ, महाविद्यालय जबाबदारउच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश; प्रलंबित अर्जांची पडताळणी करा
16
सोने करणार मालामाल, सर्व विक्रम मागे पडणार! वर्षभरात ४१ वेळा गाठला उच्चांक, दरात ३४ टक्के वाढ
17
२२ व्या मजल्यावरून उडी मारत महिलेची आत्महत्या, कासारवडवलीतील घटना
18
गिटार खरेदीमध्ये दुकानदाराला गंडा, बोगस यूपीआय क्रमांक दाखवत लुबाडले
19
दिवाळीत ट्रम्प यांचा नवा डाव, हिंदू अधिकारांच्या रक्षणाचा मुद्दा, चक्र फिरणार?
20
मतदार यादी अन् बूथ हीच आता युद्धभूमी... लोकसभेच्या पराभवानंतर भाजपची नवीन रणनीती

नाईक शिक्षण संस्थेत ‘परिवर्तन’२९ पैकी २८ जागा पटकावल्या

By admin | Published: July 22, 2014 10:52 PM

दिघोळे पराभूत; अध्यक्षपदी कोंडाजी आव्हाड

नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत १५ वर्षांनंतर प्रथमच विद्यमान अध्यक्ष माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांना कोंडाजी आव्हाड यांच्याकडून ८३४ मतांनी पराभूत व्हावे लागले. कोंडाजी आव्हाड व हेमंत धात्रक यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलने श्रीविजय पॅनलचा धुव्वा उडवित २९ पैकी २८ जागांवर विजय मिळविला. श्रीविजय पॅनलचे एकमेव विजयी उमेदवार नगरसेवक दामोदर मानकर यांनी अवघ्या एका मताने विनायक शेळके यांचा पराभव केला.सोमवारी सकाळी सुरू झालेली मतमोजणी मंगळवारी सकाळी सात वाजता संपली. विश्वस्त पदासाठीच्या सहा जागांसाठी परिवर्तनच्या बाळासाहेब गामणे (३६२४), विठ्ठलराव पालवे (३४२१), बबनराव सानप (३२८९), (पान ७ वर)अ‍ॅड. वाळीबा हाडपे (३२४१), डॉ. धर्माजी बोडके (३२४०) हे उमेदवार विजयी झाले, तर विनायक शेळके यांना श्रीविजयच्या दामोदर मानकर यांच्यापेक्षा (३०११) अवघे एक मत कमी पडल्याने पराभूत व्हावे लागले. नाशिक तालुका संचालक पदासाठी परिवर्तन पॅनलचे महेंद्र आव्हाड (३५५२), प्रकाश घुगे (३६३२), गोकुळ काकड (३६०५), माणिक सोनवणे (३४२४) यांनी श्रीविजयच्या चारही उमेदवारांना सहाशे ते नऊशे मतांनी पराभूत केले. निफाड तालुका संचालक पदासाठी परिवर्तन पॅनलचे उमेदवार बंडू नाना दराडे (३८२४), रामनाथ नागरे (३५३५), भगवान सानप (३५५०) यांनी श्रीविजयच्या उमेदवारांचा नऊशे ते बाराशे मतांनी पराभव केला. दिंडोरी संचालक पदासाठी परिवर्तन पॅनलचे कचरू आव्हाड (३७५६), शरद बोडके (३७१४) व यशवंत दरगोडे (३५३८) यांनी विजय मिळविला. येवला संचालक पदासाठी महेश आव्हाड (३७१५) व संपत वाघ (३५४२) यांनी विजय मिळविला. सिन्नर संचालक पदासाठी बाळासाहेब चकोर (३७५७), हेमंत नाईक (३६५२), सुदाम नवाळे (३३७१) यांनी, तर महिला राखीव गटातून कविता शिवाजी मानकर (३७३५) व शैलेजा अशोक बुरकूल (३४६७) यांनी विजय मिळविला. सहचिटणीस पदासाठी अ‍ॅड. तानाजी जायभावे यांनी सर्वाधिक ४३४३ मते मिळवून गोविंद साबळे यांचा २२११ मतांनी पराभव केला. सरचिटणीस पदासाठी परिवर्तनचे हेमंत धात्रक यांनी ४१०० मते मिळवित अ‍ॅड. पी. आर. गिते यांचा १८७५ मतांनी परावभ केला. उपाध्यक्ष पदासाठी परिवर्तनच्या प्रभाकर धात्रक यांनी ३५४८ मते घेत अ‍ॅड. विलास आंधळे यांचा ५३० मतांनी पराभव केला, तर सर्वाधिक चुरशीची अध्यक्षपदाची लढत होईल अशी अपेक्षा असताना, प्रत्यक्षात कोंडाजी आव्हाड यांनी ३६३५ मते घेत माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांना ८३४ मतांनी पराभूत केले. सोमवारी सकाळी ८ वाजेपासून सुरू झालेली मतमोजणी मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास संपली. मात्र सोमवारी मध्यरात्रीच विजयाचा कौल पाहता परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी विजयोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. मात्र, परिवर्तन पॅनलच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना हार-तुरे आणण्यास व गुलाल उधळण्यास मनाई करीत हा विजय स्व. गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली म्हणून घोषित केला. यावेळी परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार कोंडाजी आव्हाड, हेमंत धात्रक, माणिक सोनवणे, महेश आव्हाड, महेंद्र आव्हाड, बाळासाहेब गामणे, कविता शिवाजी मानकर यांच्यासह सर्वच उमेदवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)इन्फो..एक मताचा घोळविश्वस्तपदासाठी परिवर्तन पॅनलचे पाचही उमेदवार विजयाकडे आगेकूच करीत असताना विनायक शेळके व श्रीविजय पॅनलचे दामोदर मानकर यांच्यात सातव्या फेरीनंतर रस्सीखेच सुरू झाली. निकालाच्या सर्वात शेवटी दामोदर मानकर यांना ३०११, तर विनायक शेळके यांना ३०१० मते पडल्याने मानकर यांना निवडणूक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. जालिंदर ताडगे यांनी विजयी घोषित करताच परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी त्यास तीव्र हरकत घेत दुबार मतमोजणीची मागणी केली. मात्र ताडगे यांनी ती फेटाळली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.सप्तशृंगीचे घेतले दर्शनपरिवर्तन पॅनलच्या विजयी उमेदवारांनी मंगळवारी (दि.२२) दुपारी वणी येथे जाऊन सप्तशृंगी देवीचे दर्शन केले. त्यानंतर बुधवारी (दि.२३) हे सर्व विजयी उमेदवार पदभार स्वीकारणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंगळवारी निकालानंतर बहुतांश संचालकांनी दिवसभर आराम घेणे पसंत केले.