राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नलिनी कैलास मुंडे तर उपसरपंचपदी सुभाष एकनाथ वाघ यांची बिनविरोध निवड झाली आहे.सरपंच व उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी ये. बी. गायके यांनी निवड झाल्याचे जाहीर केले. निवडणूक निर्णयअधिरी ग्राम विकास अधिकारी रामदास मंडलिक, तलाठी डी. एस. रोहकले यांनी काम पाहिले. यावेळी कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला.याप्रसंगी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा गावकऱ्यांनी सत्कार केला. या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये परिवर्तन विकास पॅनलचे नेतृत्व परसराम दराडे, दिनेश आव्हाड, एकनाथ वाघ, रमेश वाघ, कारभारी आगवन, रामदास जाधव, यांनी केले. यावेळी नवनिर्वाचित सदस्य ज्ञानेश्वर दराडे, प्रकाश वाघ, विजय ठाकरे, अलका सोनवणे, लता जाधव, वंदना सानप, वंदना आगवन, नामदेव पवार आदी उपस्थित होते.याप्रसंगी शिवसेना तालुका उपप्रमुख अण्णासाहेब मुंडे, दत्ता सानप, सुनील मुंडे, पप्पू बोडके, भारत वाघ, दामू सोनवणे, संजय ठाकरे, अनिल वाघ, गोरख सानप, संपत अलगट, सचिन जाधव, गोरख जाधव, तुळशीराम विंचू, भास्कर दराडे, मारुती वाघ, एकनाथ आव्हाड, सुधाकर दराडे, गंगाधर दराडे, सुरेश आगवन, अशोक आव्हाड, गोरखनाथ घुगे, महेश आव्हाड, विलास घुगे, पांडुरंग मुंडे, दत्तु मुंढे, रमेश मुंढे,अशोक मुंढे आदी उपस्थित होते.माझ्या सासऱ्यांचे अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी निवडणूक लढवली व ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले. तसेच गाव विकासासाठी मी माझी भुमिका चांगल्याप्रकारे राबविण्यात लक्ष देणार असून गोरंगरिब व गावात अपुऱ्या असलेली कामे पुर्ण करणार आहे. - नलिनी मुंढे, सरपंच, राजापुर.(१३ राजापूर, १)
राजापूरच्या सरपंचपदी नलीनी मुंढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 5:54 PM
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नलिनी कैलास मुंडे तर उपसरपंचपदी सुभाष एकनाथ वाघ यांची बिनविरोध निवड झाली आहे.
ठळक मुद्देसुभाष वाघ यांची उपसरपंच बिनविरोध निवड