सटाणा : शहरातील श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज सेवा मंडळ ट्रस्टतर्फे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा मंगळवारी (दि.३०) शेकडो भाविक व समाजबांधवांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्र मांसह श्री संत नामदेव महाराज यांच्या पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. फुलांनी सजविलेल्या रथावरील संत नामदेवांची प्रतिमा हे प्रमुख आकर्षण ठरले.पालखीचे दर्शन घेण्यासाठी शहरवासीयांनी गर्दी केली होती. चौकाचौकांत मिरवणूक येताच भाविक पालखीचे पूजन करून दर्शन घेत होते. मिरवणुकीत ठिकठिकाणी भाविकांसह समाजबांधव सहभागी होत असल्याने मंगलमय वातावरण तयार झाले होते. अकरा वाजता नामदेव महाराज मंदिरात मिरवणुकीचा समारोप झाला. लाडशाखीय वाणी मंगल कार्यालयात संजीवनी पिंपळनेरकर यांचे प्रवचन झाले. यानंतर समाजाचे अध्यक्ष मोहन कापडणीस यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी गुणगौरव कार्यक्र म संपन्न झाला. व्यासपीठावर उपाध्यक्ष नितीन बिरारी, महिला जिल्हा उपाध्यक्षा सुरेखा तरटे, शहराध्यक्ष कामिनी निकुंभ, युवती अध्यक्ष प्रीती कापुरे, दत्तात्रेय कापुरे, जयेश सोनवणे, स्वप्नील जाधव आदी उपस्थित होते.कार्यक्र मास कृष्णा जगताप, दिनेश बोरसे, दीपक नंदाळे, राजेंद्र बाविस्कर, आर. आर. निकुंभ, दिलीप चव्हाण, संदीप अहिरराव, हरी तरटे, विनायक बोरसे, सुनीता ईसई, जयश्री खैरनार, श्याम कापुरे, राजेंद्र सावळे आदींसह शेकडो समाजबांधव उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते पूजनमंगळवारी पहाटे पाच वाजता येथील श्री संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिरात समाजाचे शहराध्यक्ष मोहन कापडणीस यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक व महापूजा करण्यात आली. सकाळी अखिल भारतीय शिंपी समाजाचे कार्याध्यक्ष रविंद्र बागूल व मिना बागूल यांच्या हस्ते महाआरती झाली. यानंतर शिंपी समाज सेवा मंडळ ट्रस्ट, नवयुवक मंडळ व महिला मंडळाच्या पदाधिकाº्यांसह पायी पालखी सोहळ्यास सुरु वात झाली. टाळ - मृदुंगाचा गजर व संत नामदेव महाराजांचा जयघोष करीत महालक्ष्मी माता मंदिर, कालिका माता मंदिर व देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज मंदिरमार्गे पालखी मिरवणूक निघाली.
सटाण्यात नामदेव महाराज पुण्यतिथी सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 6:45 PM