त्र्यंबकेश्वर : येथील बँक आफ महाराष्ट्रमध्ये केवळ महाराष्ट्र याच नावाने त्र्यंबकेश्वर परिसरातीलच नव्हे तर संपुर्ण त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बहुतेक लोकांनी खाते उघडले आहे.पण गेल्या वर्षभरापासुन त्र्यंबकेश्वर शाखेत दोन परप्रांतीय कर्मचारी की अधिकारी रुजु झाल्या पासुन त्यांना मराठी माहित नाही. त्या हिंदीमधुन बोलतात. पण या भागात ९० टक्के आदिवासी लोक असल्याने लोकांनाहिंदी आणि महिला अधिकाऱ्यांची बारीक आवाजातील हिंदी भाषा समजत नाही. त्यामुळे व्यवहार करण्यास अडचणी येतात. ग्रामीण शेतकरी शेतमजुरी आदिवासी आणि अशिक्षित असल्यामुळे महिलांना भाषा समजत नाही. यापुर्वी अधिकारी कर्मचारी सर्व मराठी भाषिक होते. ते ग्राहकांना समजुन सांगत. विशेष म्हणजे या महिला अधिकाऱ्यांना समजले नाही तर त्या चिडचिड करतात. डोके लावणाऱ्या व्यक्तीस लगेच बाजुला काढुन पुढील नंबरच उभे असलेल्या कस्टमरला काम केले जाते. वास्तविक शंका विचारणे गुन्हा नाही. पण त्यास बाजूला काढुन पनिशमेंट करण्याची काही गरज नसते. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा येथेही बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा आहे. पण अधिकारी व कर्मचारी मराठी भाषिक असल्ययाने बँकेचे सर्व व्यवहार सुरळीत होत असतात.त्र्यंबकेश्वर हे तालुक्याचे ठिकाण असुन शासकीय योजनांची लाभ राष्ट्रीयकृत व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी असल्याने येथील बँकांनी संबंध येतो. केवळ महाराष्ट्र बँकच नाही तर सिंडिकट बँक भारतीय स्टेट बँक आयसीआयसीआय बँक आदी ठिकाणी भाषेची व व्यवहाराची अडचण निर्माण होते. यासाठी शक्यतो मराठी भाषिक कर्मचारी बँकांनी नेमावेत अशी मागणी त्र्यंबकेश्वरवासियांकडून होत आहे.
नाव बँक ऑफ महाराष्ट्र अन् बँकेत मराठीचा मागमुस नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 10:19 PM
त्र्यंबकेश्वर : येथील बँक आफ महाराष्ट्रमध्ये केवळ महाराष्ट्र याच नावाने त्र्यंबकेश्वर परिसरातीलच नव्हे तर संपुर्ण त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बहुतेक लोकांनी ...
ठळक मुद्देशक्यतो मराठी भाषिक कर्मचारी बँकांनी नेमावेत अशी मागणी