शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

थोरलेपणाच्या सातबाऱ्यावर भाजपाचे नाव; शिवसेनेच्या वाट्याला सानपण!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 4:38 PM

महाराष्ट्रात १९९२ च्या सुमारास शिवसेना-भाजपाची युती झाली आणि १९९५ ची निवडणूक पहिल्यांदा दोघांनी एकत्र लढली.

- धनंजय वाखारे

नाशिक : राजकारणात कोणी छोटा अन् मोठा नसतो. महाराष्ट्राच्या राजकारणात युतीचा फॉर्म्युला सेना-भाजपाच्या रूपाने राबविला गेला आणि भाजपाला धाकला भाऊ मानत १९९५ ते २००९च्या विधानसभा निवडणुकांपर्यंत थोरलेपण मिरवून घेणाऱ्या शिवसेनेला आता जागावाटपात सानपण घेण्याची नामुष्की ओढवली आहे, ती जनाधार टिकवून ठेवता न आल्याने. गेल्या सहा निवडणुकांकडे दृष्टिक्षेप टाकला, तर भाजपाचा मतांचा टक्का वाढत जात असताना शिवसेनेच्या जनाधारात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत नाही.महाराष्ट्रात १९९२ च्या सुमारास शिवसेना-भाजपाची युती झाली आणि १९९५ ची निवडणूक पहिल्यांदा दोघांनी एकत्र लढली. त्यावेळी भाजपने ११६ जागा लढत ६५ जागा जिंकल्या. भाजपाच्या २५ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली, तर एकूण मतांची टक्केवारी १२.८० होती. तर शिवसेनेने १६९ जागा लढत ७३ जागा जिंकल्या. सेनेच्या ६० उमेदवारांची अनामत जप्त झाली, तर मतांची टक्केवारी १६.३० टक्के होती. त्यावेळी युती पहिल्यांदा सत्तेवर आली. १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाने ११७ जागा लढत ५७ ठिकाणी विजय संपादन केला. त्यावेळी भाजपाच्या पारड्यात १४.५४ टक्के मते पडली होती. शिवसेनेने १६१ जागा लढत ६९ जागा जिंकल्या होत्या. त्यांच्या २८ उमेदवारांची अनामत जप्त होऊन त्यांनी १७.३३ टक्के मते घेतली होती.

२००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाने १११ जागांवर उमेदवारी करत ५४ जागा जिंकल्या. त्यावेळी १० उमेदवारांची अनामत जप्त होत मतांची टक्केवारी १३.६७ टक्के होती. शिवसेनेने १६३ जागा लढत ६२ जागांवर यश मिळविले. त्यांच्या १५ उमेदवारांची अनामत जप्त होऊन १९.९७ टक्के मते घेतली. २००९ च्या निवडणुकीतही युती होऊन भाजपाने ११९, तर शिवसेनेने १६० जागा लढल्या. त्यात भाजपाने ४६, तर शिवसेनेने ४४ जागा जिंकल्या. भाजपच्या पारड्यात १४.०२ टक्के तर शिवसेनेच्या पारड्यात १६.२६ टक्के मते पडली. त्यावेळी शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राज ठाकरे यांच्या मनसेने १३ जागा जिंकत ५.७१ टक्के मते घेत मोठा दणका दिला होता. त्यावेळी पहिल्यांदा शिवसेनेच्या मतांच्या टक्केवारीत घसरण झाली आणि थोरलेपणाचे आसन डळमळण्यास सुरुवात झाली.२०१४ च्या निवडणुकीत लहान कोण, मोठा कोण? या वादात भाऊबंदकीचा अध्याय सुरू झाला अन् युती दुंभगली जाऊन भाजपा-सेना स्वतंत्र लढले. मोदी लाटेवर स्वार होत भाजपाने २६० जागा लढत तब्बल १२२ जागांवर विजय संपादन केला. त्यांच्या ४९ उमेदवारांची अनामत जप्त झाली; पण मतांच्या टक्केवारीचा आलेख १४.०२ वरून थेट २७.९१ टक्क्यांवर जाऊन पोहोचला, तर त्या तुलनेत शिवसेनेने २८२ जागा लढवत ६३ जागांवर विजय मिळविला. त्यांच्या १२९ उमेदवारांची अनामत जप्त होऊन मतांच्या टक्केवारीत ३.०९ टक्क्यांनी अल्पशी वाढ झाली. विशेष म्हणजे २००९ मध्ये ५.७१ टक्के मते घेणा-या मनसेच्या मतांच्या टक्केवारीतही घट होऊन ती ३.१५ टक्क्यांवर आली. १९९५ ते २००९ पर्यंत थोरलेपण मिरवणा-या शिवसेनेला जनाधार फारसा वाढविता आला नाही. त्या तुलनेत भाजपाने दर निवडणुकीत जनाधार वाढवत नेत २०१४ मध्ये लक्षणीय मताधिक्य प्राप्त केले. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून थोरलेपण हिसकावून घेत भाजपाने जास्त जागांवर हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे.

बडे मियाँ बडे मियाँ...शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असेपर्यंत शिवसेना-भाजपा युती अभंग होती. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत पहिल्यांदाच सेना-भाजपा स्वतंत्र लढले. या निवडणुकीत भाजपने ४६ वरून थेट १२२ जागांवर झेप घेतली, तर शिवसेनेला ४४ वरून ६३ जागांवरच मजल मारता आली. २००९ च्या निवडणुकीतच भाजपाने आपणच थोरले असल्याची जाणीव सेनेला करून दिली होती; परंतु थोरलेपणाच्या नशेत वावरणा-या सेनेकडून ही उपाधी भाजपने २०१४ च्या निवडणुकीत हिसकावून घेतली. आता महाराष्ट्राच्या राजकारणात बडे मियाँ बडे मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्ला... असा प्रत्यय आणून देण्यात राष्ट्रीय पक्ष असलेला भाजपा यशस्वी ठरला आहे.

निवडणुकांतील मतांची टक्केवारी

वर्ष        भाजपा          सेना

1990    10.71        15.94

1995    12.80       16.39

1999    14.54      17.33

2004    13.67      19.97

2009    14.02       16.26

2014    27.81      19.35

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNashikनाशिक