येवला : नाशिक येथील नवीन विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्याची मागणी राष्ट्रीय दलित पँथरने एका निवेदनाद्वारे विभागीय आयुक्तांकडे केली आहे.
राष्ट्रीय दलित पँथर संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भालेराव यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना सदर निवेदन देण्यात आले. ओझर विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्यात यावे. आंबेगाव येथील दादासाहेब गायकवाड यांचे अपूर्ण स्मारक पूर्ण करण्यात यावे तसेच द्वारका (नाशिक) येथील उड्डाणपुलाला लोककवी वामन दादा कर्डक नाव देण्यात यावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. या मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे. निवेदनावर राष्ट्रीय उपाध्यक्ष विजयराज पगारे, जिल्हाध्यक्ष मोहन खरे, रूपेश सोनवणे, नाना काळे, सागर कडवे, सूर्यवंशी शुभम पवार, अधिराज पगारे, देवराज पगारे, साईराज पगारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
-------------------
नाशिक येथील नवीन विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्यात यावे, या मागणीचे निवेदन विभागीय आयुक्त गमे यांना देताना नानासाहेब भालेराव, विजयराज पगारे, मोहन खरे आदी. (२३ येवला २)
===Photopath===
230621\23nsk_2_23062021_13.jpg
===Caption===
२३ येवला २