प्रभाग ३१ मधील राणे नगर, चेतना नगर, राजीव नगर, किशोर नगर, सदिच्छा नगर, वासन नगर, समर्थ नगर, सोनवणे मळा, नागरे नगर, जायभावे नगर, सेंट फ्रान्सिस शाळा परिसर, पोलीस वसाहत आदी भागातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचा कामाचा शुभारंभ व सुशीला बिरारी मार्ग तसेच मातोश्री चौक या नामकरण फलकाचे अनावरणही खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, वसंत गीते, दता गायकवाड, अजय बोरस्ते, विनायक पांडे, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, देवानंद बिरारी उपस्थित होते. प्रास्ताविक आयोजक नगरसेवक संगीता जाधव यांनी केले होते. स्वागत माजी स्थायी सभापती अमोल जाधव यांनी केले. यावेळी त्र्यंबक कोंबडे, शैलेश कार्ले, दीपक केदार, महेश चव्हाण, महेश कोथमिरे आदी उपस्थित होते.
(फोटो १३ राऊत) सदर बातमीची जाहिरात आहे.