जुने नाशिक -भागात बहुतांश मतदार याद्यांमध्ये नावांचा घोळ झाल्याने काही मतदारांनी नाराजी दर्शविली. येथील काही याद्यांमध्ये नावांबरोबरच पत्त्यांच्या चुका, तर काहींचे नावच याद्यांमध्ये नसल्याने अनेकांचा हिरमोड झाला. येथील नॅशनल उर्दू शाळा या मतदान केंद्रावरील केंद्र क्रमांक ११८ येथील मतदार यादीमध्ये चक्क पुणे महामार्गालगतच्या डीजीपीनगर क्रमांक-१ येथील रहिवासी डॉ. राजेंद्र सावंत व त्यांच्या पत्नी सीमा सावंत यांची नावे होती. विशेष म्हणजे, गेल्या लोकसभेच्या निवडणूकीतदेखील या सावंत दांपत्याची नावे उर्दू शाळा केंद्रावरच आली होती. त्यामुळे त्यांनी मतदानाच्या पत्ता व यादी भाग क्रमांक दुरुस्तीचा अर्ज भरून दिला होता. तरीदेखील विधानसभा निवडणुकीत त्यांची नावे डीजीपीनगरच्या मतदार यादीत समाविष्ट होऊ शकली नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
नावांचा घोळ; मतदारांची नाराजीं
By admin | Published: October 16, 2014 12:27 AM