या चौकास स्व. यादवराव तुंगार यांचे नाव देण्याची संकल्पना नगरसेविका त्रिवेणी तुंगार सोनवणे यांची होती. याबरोबरच त्र्यंबकनगर परिषदेच्या सभागृहात स्व. यादवराव तुंगार यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. जव्हारफाटा येथे चौकास नाव देण्याचे कारण म्हणजे तुंगार यांचे राजकीय जीवन त्यांनी त्र्यंबकेश्वर कनझ्युमर्स सहकारी संस्था त्र्यंबकेश्वर विविध कार्यकारी सहकारी संस्था लि. भात गिरणी सहकारी संस्था आदी सहकारी क्षेत्रातील त्यांचे योगदान मोलाचे होते. आता ज्या ठिकाणी जव्हारफाटा परिसरातील चौकास नाव दिले आहे. तेथे आता नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार साकारत आहे. कार्यक्रमासाठी बाळासाहेब सावंत, सुरेश गंगापुत्र, भाजप शहराध्यक्ष सुयोग वाडेकर, विराज मुळे, हर्षल शिखरे, कैलास भुतडा, सागर उजे, ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप जोशी, सचिन दीक्षित, भूषण अडसरे उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष भुजंग यांनी केले.
--------------------
त्र्यंबकेश्वर येथे स्व. यादवराव तुंगार नामफलकाच्या अनावरणप्रसंगी मुरलीधर थेटे, त्रिवेणी तुंगार, बाळासाहेब सावंत, सुरेश गंगापुत्र आदी.
(१७ टीबीके १)
===Photopath===
170621\111217nsk_9_17062021_13.jpg
===Caption===
१७ टीबीके १