शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
4
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
5
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
6
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
7
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
8
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
9
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
10
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
12
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
13
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
14
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
15
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
16
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
17
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
18
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
19
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...

बनावट कागदपत्रे  देऊन नामको बॅँकेला ४१ लाखांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 1:26 AM

वाहने खरेदी करण्यासाठी बनावट कागदपत्रे अंबड येथील नाशिक मर्चंट्स  को-आॅप. बॅँकेच्या शाखेत देऊन कर्ज प्रकरणात सुमारे ४१ लाखांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी सहा संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

सिडको : वाहने खरेदी करण्यासाठी बनावट कागदपत्रे अंबड येथील नाशिक मर्चंट्स  को-आॅप. बॅँकेच्या शाखेत देऊन कर्ज प्रकरणात सुमारे ४१ लाखांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी सहा संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.नामको बॅँकेचे अंबड शाखेचे शाखाधिकारी उमाजी गावित यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित विवेक अरु ण उगले (रा. पाथर्डीफाटा), सुनील रुंजा धोंगडे (रा. कुरेगाव), सोमनाथ गेणू गव्हाणे (रा. सावतानगर), भास्कर परशराम नरवाडे (रा. आंबेबहुला), संगीता पंढरीनाथ कोंबडे, सुरेश गंगाधर कोंबडे (दोघे रा. पाथर्डीफाटा) यांनी संगनमताने बनावट कागदपत्रे तयार केली. विविध नामांकित कंपन्यांच्या शोरूमच्या नावाने कोटेशनही बॅँकेच्या शाखेत सादर केले. तसेच टाटा कंपनीचा ट्रक खरेदीसाठी वीस लाख ८५ हजार, फियाट पुंटो इमोशन या कार खरेदीसाठी आठ लाख पन्नास हजार रु पये, टाटा सफारी कार खरेदीसाठी अकरा लाख चाळीस हजार रुपयांचे धनादेश नामको बॅँकेकडून शहरातील विविध नामांकित चारचाकी विक्री करणाऱ्या कंपन्यांच्या दालनांच्या नावाने घेऊन पाथर्डीफाटा येथील स्टेट बॅँक आॅफ हैदराबाद शाखेतून तब्बल ४१ लाख रुपये स्वत:च्या वैयक्तिक खात्यावरून काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी संबंधित उगले याने स्वत:ला मोटार विक्री दालनाचा संचालक असल्याचे भासवले. दरम्यान, नामको बॅँकेकडे खोटी व बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, उपनिरीक्षक सुजित मुंढे करीत आहेत.असा झाला उलगडा...संशयित कर्जदारांनी धनादेश आयसीआयसीआय बॅँकेचा नामकोच्या अंबड शाखेला दिला. हा धनादेश बॅँकेने पाठविला; मात्र धनादेश वटू शकला नाही. या प्रकरणी नामको व्यवस्थापनाने संबंधितांना नोटीस बजावली. नोटिसांद्वारे खरेदी वाहने पडताळणीसाठी बॅँकेत हजर करावी, असे फर्मान सोडले; मात्र कर्जदारांनी वाहन खरेदी न करता रोकड लंपास केल्याचे उघडकीस आले.संचालक भासविलेच्उगले याने नामांकित दालनाचे  स्वत:ला संचालक भासवून बॅँकेकडून वाहन खरेदीसाठी घेतलेले धनादेश अनुक्रमे २० लाख ८५ हजार, ८ लाख ५० हजार, ११ लाख ४० हजार रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सदर धनादेश उगले याने संगनमताने स्टेट बॅँक आॅफ हैदराबादच्या शाखेतून वटविले. यावेळी त्याने परस्पर रक्कम काढून बॅँकेची फसवणूक केली. या प्रकरणामध्ये बॅँकेच्या कर्मचाºयांसह अधिकाºयांवरही पोलिसांना संशय आहे. उगले याने वरील मोटार विक्री करणाºया दालनांच्या नावाने बनावट व नावांशी साम्य असलेले कार्यालयही उघडले होते  असे समजते.

टॅग्स :bankबँकCrimeगुन्हा