लोकमत न्यूज नेटवर्कनामपूर : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला नामपुरात चांगलाच प्रतिसाद मिळाला असून, सर्व पक्षांच्या नेत्यांनी साक्र ी चौफुलीवर रास्ता रोको करून शासनाला निवेदन सादर केले .सकाळी ११ वाजता शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत साक्री चौफुलीवर रास्ता रोकोस सुरुवात करण्यात आली. यात दयाने येथील कांदा उत्पादक शेतकरी शैलेंद्र कापडणीस यांनी भाजपा सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या, तर नामपूरचे तंटामुक्त अध्यक्ष प्रवीण सावंत यांनी भाजपा प्रवक्ते माधव भंडारी, व प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा जाहीर भाषणातून निषेद व्यक्त केला, तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते खेमराज कोर यांनी कुठे गेले अच्छे दिन म्हणत आज सर्वांनाच बुरे दिन आले असून, हे सरकार शेतकरीविरोधात असल्याचे सांगितल. आज शेतकऱ्यांना कोणीच वाली राहिले नसून बँकेत कर्ज मिळत नाही, युवकांना नोकऱ्या मिळत नाहीत, शेतमालास भाव मिळत नाही, कांदा व टमाटा रस्त्यावर फेकला जात आहे. राज्यात शेतकरी आत्महत्या करत असताना मुख्यमंत्री खोटी आश्वासने देऊन जनतेला फसवत आहेत, असा आरोप खेमराज कोर यांनी केला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटला कुलूप लावण्यात आले. तसेच नामपूर गावातील आंबे व भाजीपाला विक्रेत्यांना माल विकण्यास मज्जाव करण्यात आला. दूध संकलन केंद्रांनासुद्धा तरुण शेतकऱ्यांनी सील लावण्याचा इशारा देण्यात आला. या संपाचे नेतृत्व गावचे तंटामुक्त अध्यक्ष प्रवीण सावंत,अशोक सावंत, शशिकांत कोर, भाऊसाहेब सावंत, किरण अहिरे, खेमराज कोर, नारायण सावंत, नानाजी रौदळ , समीर सावंत , रविंद्र कोर .भाऊसाहेब कापडणीस, .महेश सावंत .शैलेन्द्र कापडणीस, ,पंढरीनाथ अहिरे यांनी केले. विशेष म्हणजे या संपात भाजपा पक्ष सोडून इतर सर्वच पक्षाच्या नेत्याची हजेरी लावली. दुपारी १ वाजेच्या दरम्यान बाजार समिती गेटसमोर पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, सहायक पोलीस उपनिरीक्षक श्रीराम कोळी, मंडल अधिकारी सी. पी. अहिरे यांच्याकडे निवेदन देण्यात आले
नामपूरला जनजीवन विस्कळीत
By admin | Published: June 02, 2017 1:01 AM