लोकमत न्यूज नेटवर्क
नामपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने अवघ्या जगाला ग्रासले असून त्याच्या संसर्गापासून जनतेला वाचविण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्नांची पराकाष्टा केली जात आहे. असे असताना कोरोना संशयित रुग्णावर साधे प्राथमिक उपचार करण्याची औषधे व साधनसामग्री उपलब्ध नसल्याने नामपूरचे ग्रामीण रुग्णालय केवळ शोभेचे बाहुले बनले आहे. परिणामी परिसरातील नागरिकांमध्ये सखेद आश्चर्य व संतापही व्यक्त केला जात आहे.कोरोना विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार माजविल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्य व केंद्र शासनाने संचारबंदी व लॉकडाउनची हाक दिली. त्याचे पालन गल्लीपासून दिल्लीपर्यंत केले जात आहे. शासन आदेशामुळे प्रत्येक माणसाने स्वत:ला घरात कोंडून ठेवले आहे. त्यामुळे नामपूरसह पंचक्रोशीतील व्यवहार ठप्प झाले आहेत. असे असले तरी वेगवेगळ्या आजाराच्या निमित्ताने परिसरातील गावातील रुग्णांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयावर अवलंबून राहावे लागते, मात्र अपुरा कर्मचारीवर्ग आणि साहित्याचा तुटवडा यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेली इमारत फक्त नावाला उभी आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, सध्या देशावर कोरोना विषाणूचे संकट ओढवल्याने अशा परिस्थितीत शासनाच्या वैद्यकीय विभागाने दक्षता घेणे गरजेचे होते, मात्र कोरोनावर प्राथमिक उपचाराची साधनेही याठिकाणी उपलब्ध नसल्याची बाब गंभीर मानली जात आहे. तसेच मास्क, सॅनिटायझर अशा छोट्या-छोट्या बाबीही याठिकाणी पुरविण्यात आलेल्या नाहीत. यासंदर्भात जिल्हा शासकीय रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. जगदाळे यांना खळविण्यात आले असून या रुग्णालयात कोरोनाशी निगडित साधनसामग्री उपलब्ध न झाल्यास आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा काँग्रेसचे नारायण सावंत, गणेश खरोटे, राजेंद्र पंचाळ, कमलाकर सोनवणे व तारीक शेख यांनी दिला आहे. कर्मचारी समाधान शेलार यांनी आतापर्यत १०७ रुग्णांना तपासले असून यात मुंबई, पुणे किंवा बाहेरगावाहून नामपूरला आलेल्यांचीच संख्या अधिक आहे. त्यांना होम क्वॉरण्टाइनच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. नामपूर शहर पूर्णत: लॉकडाउन असून, पोलीस उपनिरीक्षक. स्वप्नील कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने पूर्णत: नाकेबंदी केली आहे. सरपंच व सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी केशवराव इंगळे यांच्याकडूनही संसर्ग न होण्यासाठी दखल घेतली जात आहे.यंत्रसामग्रीही धूळ खात पडूनया रु ग्णालयात अनेक रुग्ण येतात, परंतु प्राथमिक उपचाराची व्यवस्थाही याठिकाणी नसून येथील यंत्रसामग्रीही धूळ खात पडून आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टळावा यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश खरोटे यांनी आपला ब्लोअर आणून स्वखर्चाने ग्रामीण रुग्णालय परिसरात फवारणी करु न दिली. ग्रामीण रु ग्णालयात दररोज कोरोना विषाणू तपासणीसाठी अनेक रु ग्ण येतात, मात्र येथील कर्मचारी स्वखर्चाने प्राथमिक वस्तू आणून सुविधा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. आतापर्यंत ५०० च्या वर रु ग्णांची तपासणी करण्यात आली आहे.