नामपूर : हरवलेल्या माहेरपणाला आश्वत साद घालत लेकींना माहेरचं अंगण पुन्हा समृद्ध करण्याची किमया येथील सेवाभावी संस्थेच्या माहेरवाशीण सोहळ्याने साधली.श्रीहरि प्रतिष्ठानच्यावतीने नामपूरच्या माहेरवाशीण लेकींचा स्नेहसोहळा आणि गुणवंत पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी सव्वातीनशे सवाष्ण महिलांनी कलश मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी सोळा कुलस्वामिनीची सामुदायिक आरती व देवी स्तोत्र पठण करण्यात आले. यावेळी होम-मिनिस्टर कार्यक्र मात महिलांनी मनमुराद आनंद घेत विविध स्पर्धेत बक्षिसे मिळवली. माहेरच्या अंगणात बागडण्याची पुन्हा संधी मिळाल्याने वय विसरत अनेक लेकी या समारंभात सहभागी झाल्या होत्या.चौकट...मातापित्यांच्या अकाली निधनाने हरवलेलं माहेर पुन्हा गवसण्याची किमया यावेळी येथील चार अभागी मुलींना मिळाली. आई-वडील, अन लहान भावाच्या अपघाती निधनाने माहेरपणाला पोरके झालेल्या लेकींना या समारंभात गौरवण्यात आले.नामपूरकर व माहेरवाशिण लक्ष्मी-नारायण संपर्क सुचीचे प्रकाशनही प्रमुख पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील नरेंद्र वड, डॉ. प्राचार्य दिनेश शिरोडे, सृष्टी दशपुते, भालचंद्र बागड, किरण पाटील, घनश्याम अहिरे, गिरीष वाणी, डॉ. दिकपालसिंह गिºहासे, मुख्याध्यापक राजेंद्र सावंत, बापूराव वाकलकर, जितेंद्र सोनजे, शीतल वाणी, प्रकाश मालपुरे, सुजल खुटाडे, संदेश शिरोडे, प्रा. उषाश्री बागडे यांना गौरविण्यात आले.................................या कार्यक्रमात सौभाग्याची उटी, खाऊ, माहेरवाशिणीचे घर, समई आदी देऊन श्रीहरी प्रतिष्ठानने ३४७ माहेरवाशिणींचा गौरव केला. प्रत्येक माहेरवाशिणींना यावेळी आब्यांचे रोप देण्यात येऊन पर्यावरणाचा संदेश देण्यात आला.
नामपूरच्या माहेरवाशीण लेकींचा स्नेहसोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 4:37 PM
नामपूर : हरवलेल्या माहेरपणाला आश्वत साद घालत लेकींना माहेरचं अंगण पुन्हा समृद्ध करण्याची किमया येथील सेवाभावी संस्थेच्या माहेरवाशीण सोहळ्याने साधली.
ठळक मुद्देमाहेरच्या अंगणात बागडण्याची पुन्हा संधी मिळाल्याने वय विसरत अनेक लेकी या समारंभात सहभागी झाल्या होत्या.