संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष पवार यांनी नुकतीच तालुका कार्यकारिणी बरखास्त केली होती. त्यामुळे नव्या कार्यकारिणी निवडीसाठी येथील संत सावता महाराज मंगल कार्यालयात पंचायत समितीचे माजी सभापती धनसिंग वाघ यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राज्य उपाध्यक्ष पुरु षोत्तम राजपूत, कार्याध्यक्ष जितेंद्र सूर्यवंशी व संघटक प्रभाकर पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष पवार यांनी नूतन कार्यकारिणीची घोषणा केली. जिल्हाध्यक्षपदी नाना मोरकर तर तालुकाध्यक्षपदी लखन पवार यांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले. कार्यकारिणीत उपाध्यक्ष संजय पवार, संघटक दीपक ठोके, संपर्कप्रमुख युवराज निकुंभ, सहसंघटक नथा ठोके, चिटणीस साहेबराव पवार यांची तर तालुका कार्यकारिणीत कार्याध्यक्ष भावसिंग पवार, उपाध्यक्ष जयेश जाधव, मुन्ना राजपूत, संपर्कप्रमुख शरद देवरे, संघटक राजेंद्र पवार यांची नियुक्ती झाली. तालुका युवा अध्यक्षपदी शाम पवार, कार्याध्यक्षपदी जितेंद्र जाधव, उपाध्यक्षपदी सचिन पवार, वैभव सोळंके, शहर कार्याध्यक्षपदी गोविंद पवार, संघटकपदी भरत सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष मोरकर व तालुकाध्यक्ष पवार यांचा संघटनेतर्फे धनसिंग वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बैठकीस भिका ढोमसे, पप्पू सूर्यवंशी, गोकुळ पवार, सुरेश पवार, भालचंद्र पवार, धनराज पवार, रणजीत सोळंके, ईश्वर सोळंके, संजय ठोके, छोटू पवार, मनिष सोळंके, सोपान निकुंभ, प्रवीण चव्हाण, कारभारी जाधव, रवींद्र पवार, कैलास सोळंके, सुरेश पवार, सोनू बागुल, दिलीप बागुल, पंकज दात्रे, जितेंद्र पवार आदी उपस्थित होते.