निवाने - येथे विहिर कोरडीठाक पडल्याने अल्प प्रमाणात पाच दिवसाआड होणाऱ्या अल्प प्रमाणातील पाणीपुरवठ्याच्या विरोधात शेकडो महिलांनी एकत्र येऊन शनिवारी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. संतप्त महिलांनी मुबलक प्रमाणात व वेळेवर पाणी पुरवठा अशी मागणी ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे केली. कळवण तालुक्याच्या पूर्व बाजूस निवाने हे चार हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी भारत निर्माण योजनेद्वारे पाणीपुरवठा योजना राबवली असून संबधित योजनेची विहीर बगडू येथे असल्याने तिथून पाईपलाईनद्वारे पाणी निवाने येथे येत असते. परंतु सुमारे पाच कि.मी.लांबीची असलेल्या पाईपलाइन ला ठिकठिकाणी असलेल्या लिकेज काढणे,व पाणी कशा पद्धतीने पोहचेल अशा पद्धतीचे योग्य नियोजन झाल्यास पाणी पोहचू शकते असे समाधान अहेर,संजय आहेर,यांनी ग्रामविकास अधिकारी यांच्याशी चर्चा करताना सांगितले .
निवाणेत महिलांचा हंडा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 3:30 PM