नांदगाव: भालुर गटाची प्रभाग समिती सभ हिसवळ खुर्द येथे नुकतीच पार पडली. सभेच्या अथ्यक्ष स्थानी आशाजगताप होत्या. माजीआमदारसंजय पवार, माजी. जि.प.सदस्यराजेंद्र पवार, श्रावण गोरे, सुशिला नाईकवाडे,राजेन्द्र देशमुख, संजय आहेर, फिकरा जगताप, विक्र म निकम, ४२खेडी पाणी पुरवठा योजना अध्यक्ष बापुसाहेब जाधव, सर्व विभागाचे खाते प्रमुख व्यासपीठावर ऊपिस्थत होते. बैठकीत गाव निहाय व विभाग निहाय आढावा घेण्यात आला. पाणी टंचाई, चारा टंचाई या समस्या सरपंचांनी मांडल्या. टॅकर मागणी चे प्रस्ताव तात्काळ सादर करावे. आपण या बाबत जिल्हा अधिकारी यांच्या कडे पाठपुरावा करू असे माजीआमदार संजय पवार यांनी सांगितले या बैठकीत सर्व विभाग प्रमुख अधिकारी ऊपिस्थत होते. गटात सुरू असलेल्या व प्रस्तावित विकास कामे या बाबत माहिती देण्यात आली. यावेळी सरपंच रोहिणी आहेर (हिसवळ खुर्द ),संदिप आहेर ,दिपक वाघ, कोडीराम भुसनर, बाळासाहेब काळे, दत्तु नाईकवाडे, बाळासाहेब बेंडके, रामकृष्ण हेंबाडे, राजाभाऊ सांगळे, भाऊसाहेब गुंडगळ, गंगाधर माकुणे,धर्मा कुणगर, देवीदास मार्कड, मच्छीद्र सातपुते, साहेबराव मुंजाळ,संपत पवार आदि सरपंच ऊपिस्थत होते.
नांदगावला चारा,पाणी टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 2:01 PM
हिसवळ खुर्द : येथील सभेत ग्रामस्थांच्या तक्रारी
ठळक मुद्दे४२खेडी पाणी पुरवठा योजना अध्यक्ष बापुसाहेब जाधव, सर्व विभागाचे खाते प्रमुख व्यासपीठावर ऊपिस्थत होते. बैठकीत गाव निहाय व विभाग निहाय आढावा घेण्यात आला.