नांदगाव : इंधन दरवाढीसोबत सर्वच प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या महागाईला भाजपाप्रणित मोदी सरकारचा कारभार जबाबदार असल्याच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी येथील नव्या तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली.काँग्रेसचे माजी आमदार अँड अनिल आहेर,जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती अश्विनी आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सायकल स रॅली काढून मोदी सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी तहसीलदार उदय कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.आंदोलनात युवा नेते दर्शन आहेर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरेश्वर सुर्वे, शहराध्यक्ष मनोज चोपडे,महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा श्रीमती मुनवर सुलताना, प्रवीण घोटेकर, सरपंच चांदोरे, विलासभाऊ चव्हाण, दिनकर धिवरे, बापू देवरे ,शिवाजी जाधव, सोमनाथ सोनवणे, दिवेश जाधव ,रोहित सोनवणे, आसिफ तडवी आदीसह काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.
नांदगावी काँग्रेसची सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 6:49 PM
नांदगाव : इंधन दरवाढीसोबत सर्वच प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या महागाईला भाजपाप्रणित मोदी सरकारचा कारभार जबाबदार असल्याच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी येथील नव्या तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली.
ठळक मुद्देसभापती अश्विनी आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.