नांदगाव: तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा उदासीन असल्याने न्यायिक हक्काच्या मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला . यावेळी राजू देसले, भास्कर शिंदे, देविदास भोपळे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने काढण्यात आलेला हामोर्चा शासकीय विश्रामगृहपासून सुरू झाला. तालुक्यात पाऊस नसल्याने दुष्काळाचे संकट उभे राहिले असतांनाही प्रशासकीय यंत्रणा ढिम्मच असल्याचा आरोप मोर्चात सहभागी झालेल्या वक्त्यांनी आपल्या भाषणात केला वन हक्क जमिनीच्या प्रश्नावर चालढकल सुरु असून अद्यापही ज्यांना जमिनी देण्यात आल्यात त्या आदिवासींना प्रमाणपत्रे दिली गेली नाहीत याकडे अधिकाº्यांचे लक्ष वेधण्यात आले तालुका दुष्काळी घोषित करावा,जनावरांसाठी छावण्या सुरु कराव्यात मजुरांना काम मिळावे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी ,पेट्रोल-डिझेल-गॅस वाटपात सामान न्यायाने वाटप व्हावे,नार-पार चे पाणी तालुक्याला मिळावे,कांदा पिकास हमीभाव द्यावा आदी मागण्यांचे निवेदन निवासी नायब तहसीलदार मीनाक्षी बैरागी याना देण्यात आले साधना गायकवाड विजय दराडे देवचंद सुरसे प्रकाश पवार ,राजू सोनवणे,जयराम बोरसे,रतन बोरसे राजू निकम कोंडीराम माळी सुनीता कुलकर्णी निंबा आहेर,शांताराम पवार सुमनबाई पवार आदी भाकपा व किसन सभेचे कार्यकर्ते तसेच तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतमजूर आदिवासी मोठ्या संख्यने या मोर्चात सहभागी झाले होते
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा नांदगावला मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 1:38 PM
नांदगाव: तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा उदासीन असल्याने न्यायिक हक्काच्या मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला . यावेळी राजू देसले, भास्कर शिंदे, देविदास भोपळे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने काढण्यात आलेला हामोर्चा शासकीय विश्रामगृहपासून सुरू झाला.
ठळक मुद्देजनावरांसाठी छावण्या सुरु कराव्यात मजुरांना काम मिळावे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी ,पेट्रोल-डिझेल-गॅस वाटपात सामान न्यायाने वाटप व्हावे,नार-पार चे पाणी तालुक्याला मिळावे,कांदा पिकास हमीभाव द्यावा आदी मागण्यांचे निवेदन निवासी नायब तहसीलदार मीनाक्षी बै