नांदगाव : चांदोरे गावानजीक जंगलात हरणांची शिकार करण्यासाठी गेलेल्या मालेगावच्या सराईत संशियतांना वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय बोरसे यांच्या टीमने नांदगाव पोलिसांच्या मदतीने पकडले.यापूर्वी नांदगाव, येवला येथील न्यायालयात हरीण मारल्याची व मालेगाव येथील न्यायालयात मोर मारल्याची केस न्याय प्रविष्ट आहे. संशयीत आरोपी मुददशीर अहमद अकील अहमद रा. चुना भट्टी मालेगांव, आश्पाक अंजुम अहमद रा. मिल्लत नगर मालेगांव यांना अटक करण्यात आली आहे.मोटार सायकलच्या फोकस लँपच्या मदतीने फायर करु न रात्रीच्या वेळी ते शिकार करीत असत. यावेळी चांदोरे च्या जंगलात त्यांनी फायर केला आण िनेम चुकला त्याचवेळी मागावर असलेले वन अधिकारी व नांदगाव पोलीस यांच्या जाळ्यात ते अडकले.जांमदरी शिवारात १५ दिवसापुर्वी हरणाची शिकार करून ते पसार झाले होते.दरम्यान वनाधिकारी त्यांच्या मागावर होते. त्यांच्या जवळ देशी बनावटीची बंदूक एक (टुटी/बुलेट), सुरे दोन, कटर दोन, रक्ताने माखलेले कपडे, भ्रमणध्वनी, नऊ काडतुसे, फायर केलेली काडतुसे असे साहीत्य जप्त करण्यात आले आहे. शिकारींना दि २७ एिप्रललाच रात्री १२ वा रंगेहात पकडले होते. परंतु तपास कामी आरोपी संदर्भात गुप्तता पाळण्यात आली.या शिकारींनी येवला, सायगांव, भागात हरीण व मोरांची शिकार केली आहे. त्यात त्यांच्यावर कारवाई देखील झाली होती. पण जामिनावर सुटून आल्यावर ते पुन्हा शिकार करतात. वन्यप्राणी कलम ९,२७,३१ अन्वये भारतीय अधिनियम १९२७ चे कलम २६ (१) ड ५२ जैव विविधता अधिनियम २००२ चे कलम ५६ नुसार कारवाई. करुन दोघांना अटक करण्यात आली आहे.पुढील तपास सहाय्यक वन संरक्षक मनमाड राजेंद्र कापण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय बोरसे, दीपक वडगे, सुनील खंदारे, राजू दौड, गोपाल राठोड, एन एम पठाण, राजू महाजन, मल्हार पाटील, एम. बी. राठोड, नाना राठोड, सुदाम निकम, रामचंद्र गंडे, जगदीश अमलूक यानी कारवाईत भाग घेतला.
नांदगाव हरणांची शिकार संशयितांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 7:46 PM
नांदगाव : चांदोरे गावानजीक जंगलात हरणांची शिकार करण्यासाठी गेलेल्या मालेगावच्या सराईत संशियतांना वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय बोरसे यांच्या टीमने नांदगाव पोलिसांच्या मदतीने पकडले.
ठळक मुद्देमोटार सायकलच्या फोकस लँपच्या मदतीने फायर करु न रात्रीच्या वेळी ते शिकार