नांदगांव नाशिक, नांदगांव मालेगांव, नांदगांव वेहळगांव, या सह इतर मार्गावर चालणाऱ्या बसेस रस्त्यात बंद पडल्याच्या घटना आहेत. तर कधी विद्यारर्थ्यांची बस बंद पडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. नांदगांव आगारात येणारी बस मुळातच ‘आजारी’ बस असते किंबहुना अशाच बसेस नांदगांव आगाराकडे पाठविल्या जातात असे बोलले जाते. या घटनांमुळे नांदगाव आगाराच्या बस वरील प्रवाशांचा विश्वास लोप पावत चालला आहे . दि.८ फेब्रुवारी रोजी (एमएच-१४बीटी१३०३) हि नांदगांव येथून बस सकाळी ७ वा निघालेली नाशिक बस, साडे सात वाजता मनमाड नजीक बुरकुलवाडी जवळ अचानक बंद पडली. प्रवासी, विद्यार्थी व महिला बसमधून खाली उतरले आण ियेणार्या दुसर्या बसची वाट बघत बसले एक तासाच्या प्रतीक्षेनंतर आलेली दुसरी बस प्रवाशांना मिळाली त्यामुळे अनेकांची मनमाड येथून मुंबई जाणारी कुर्ला एक्सप्रेस हुकली. तर इतरांची सकाळ सञातील कामे लांबणीवर पडली. असे प्रकार वारंवार घडत असल्याने नांदगावच्या बसेसना प्रवाशांनी खटारागाडी असे संबोधन दिले आहे.