तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २,०६,८३५ लोकसंख्या आहे. अवघ्या चार दिवसांत ४१३०१ घरांना भेटी देऊन २,०३६१४ लोकांची म्हणजे ९८.४४ टक्के लोकसंख्येची तपासणी करण्यात आली. ६१८ कर्मचारी त्यासाठी नियुक्त करण्यात आले होते. शारीरिक तापमान ९८.६ पेक्षा जास्त असलेले १६९, ऑक्सिजन पातळी ९५ पेक्षा कमी असलेले ९२, पल्स रेट १०० पेक्षा जास्त असलेले १०३, अंगदुखी, वास न येणे, चव नसणे, जुलाब होणे अशा व्यक्तींची संख्या ७४, सर्दी, ताप खोकला २०८, तीव्र स्वच्छन दाह १५ तसेच १५ वर्षांवरील वयोगट ९, स्वॅबसाठी संदर्भित करण्याच्या संशयित व्यक्ती ६५५ सापडल्या. त्यापैकी १२८ रुग्ण बाधित झाल्याचे आढळून आले.
कोरोनाची साखळी तोडण्याच्या प्रयत्नातले हे महत्त्वाचे पाऊल ठरावे. आशा वर्कर, आरोग्य विभाग, शिक्षक, तलाठी, सरपंच, ग्रामसेवक यांनी सर्वेक्षणात भाग घेतला. सर्वेक्षणामुळे सर्व गावांत मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याची मानसिकता तयार झाली असल्याची माहिती चौधरी यांनी दिली.
----------------------------------------------------
(निधन वार्ता)
गोविंद काकळीज
नांदगाव : गोविंद सुखदेव पा. काकळीज (वय ७०) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक तथा स्व. दौलतराव कवडे मल्टीपर्पज को ऑप. संस्थेचे ते संचालक होते.
फोटो- ०७ गोविंद काकळीज
-----------------------------------------------
पिनाकेश्वर यात्रा रद्द
नांदगाव : जातेगाव येथील पिनाकेश्वर यात्रेचा वार्षिक उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली. सलग दुसरे वर्ष यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. तीन दिवसाच्या कार्यक्रमासाठी खान्देश व विदर्भातून भाविक येत असतात. कोरोना लवकर हद्दपार होवो आणि यात्रा भरवण्याची संधी मिळो अशी अपेक्षा भाविकांनी व्यक्त केली आहे.
===Photopath===
070521\07nsk_38_07052021_13.jpg
===Caption===
फोटो- ०७ गोविंद काकळीज