न्यायडोंगरी : ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पपनेच्या माध्यमातून संपूर्ण नांदगाव तालुक्यात एक कालबद्ध कार्यक्रमाचे नियोजन करून सर्व सामान्य लाभार्र्थींपर्यंत शासकीय योजनांचा थेट लाभ मिळवून देण्याचा स्तुत्य उपक्रम येवला येथील उपविभागीय अधिकारी वासंती माळी यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १९ जानेवारी ते ३० जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.या योजनेअंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, अपंगासाठी असलेल्या योजना, विधवा महिलांसाठी योजना अशा अनेक योजना तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी जीवनधारा ही नावीन्यपूर्ण संकल्पना नांदगाव तालुक्यातील एकूण पाच मंडल कार्यालय असलेल्या गावांमध्ये राबविण्यास येत आहे. लाभार्थींना लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे जागेवरच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत व परिपूर्ण प्रस्ताव असणाऱ्या लाभार्थींच्या प्रकरणास त्याच ठिकाणी मंजुरी देण्यात येणार आहे. या कामासाठी एकूण ९ मुख्य अधिकारी तालुक्यातील सर्व तलाठी, सर्व ग्रामसेवक त्या विभागातील वैद्यकीय अधिकारी यांनी आपल्याकडील या संदर्भातील माहिती दप्तरासह हजर राहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या उपविभागीय अधिकारी माळी या स्वत: तसेच तहसीलदार व सर्व नायब तहसीलदार हजर राहणार आहेत. पात्र लाभार्थींनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महसूल विभागाकडून करण्यात येत आहे. नांदगावी परीट धोबी समाजाची बैठकनांदगाव : येथील नांदगाव तालुका परीट धोबी समाजाची बैठक चंद्रकांत वाघ यांच्या अध्यक्षतेखाली होऊन त्यात नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. नांदगाव तालुकाध्यक्षपदी संतोष खैरनार व उपाध्यक्षपदी ललीत हजारे यांची निवड करण्यात आली. कार्यकरिणी सदस्य पुढीलप्रमाणे- कार्याध्यक्ष गोविंदा गरुड, खजिनदार योगेश जाधव, सहखजिनदार संतोष सोनवणे, सरचिटणीस रवि गरुड, सल्लागार भगवान गरुड व किशोर जाधव.भीमराव सोनवणे, मधुकर हजारे, अनिल जाधव, नरेश राऊत, भगवान सोनवणे, सुकदेव सोनवणे, रमेश जाधव, जयराम गरुड, मधुकर सोनवणे, लहू बोराडे, मनोज जाधव, आकाश बोराडे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
नांदगाव तालुक्यात ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2016 10:09 PM