नांदगाव : शहराला जोडणारा रेल्वेचा अंडरपास (सब-वे) पुन्हा पाण्याने भरल्याने नागरिकांना पाण्यातून कसरत करून मार्ग काढावा लागत आहे. पाण्यातून मार्ग काढताना वाहन बंद पडले की ओढून व ढकलून बाहेर काढताना ओलेचिंब होण्याची वेळ येते.
सध्या तीन इंची पाइप टाकून पाच एचपी जनरेटरच्या मदतीने पाणी उपसा सुरू आहे. गेले सहा दिवस पाणी उपसण्याचे काम सुरूच आहे; मात्र येणारे पाणी थांबत नाही व पंपाकडून सगळे पाणी उपसले जात नाही. नाइलाजाने पादचारी लोहमार्गावरून जीव धोक्यात घालून शहरात येतात तर दुचाकीस्वार पाण्यातून जीवघेणा प्रवास करतात. राजमार्गाने शहरात यावयाचे असले तर उड्डाणपुलावरून पाच किमी अंतर कापून शहरात यावे लागते. चांडक प्लाॅटमधील रहिवाशांना नदी व लोहमार्ग असल्याने मार्ग काढणे व शहरात व येणे कठीण झाले आहे.
फोटो - १३ नांदगाव अंडरपास
नांदगाव शहराला जोडणारा रेल्वेचा अंडरपास पाण्याने भरला आहे. त्यातून मार्ग काढताना नागरिक. (छाया : मारुती जगधने)
130921\13nsk_8_13092021_13.jpg
फोटो - १३ नांदगाव अंडरपास